राजोली येथील तरुणांना व्यायाम शाळेची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:33 IST2021-01-16T04:33:00+5:302021-01-16T04:33:00+5:30
गावपुढाऱ्यापासून तर आमदार, खासदारापर्यंत अनेकदा प्रलंबित व्यायाम शाळेच्या बांधकामाबाबत येथील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. परंतु कुणाकडूनही याची दखल ...

राजोली येथील तरुणांना व्यायाम शाळेची प्रतीक्षा
गावपुढाऱ्यापासून तर आमदार, खासदारापर्यंत अनेकदा प्रलंबित व्यायाम शाळेच्या बांधकामाबाबत येथील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. परंतु कुणाकडूनही याची दखल घेतल्या गेली नाही. परिणामी येथील युवकांना व्यायामपासून वंचित रहावे लागत आहे.
ना. नितीन गडकरी भाजप प्रदेशाध्यक्ष असताना येथे आयोजित एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यांच्या हस्ते या व्यायाम शाळेचे भूमिपूजन मोठ्या थाटामाटात पार पडले होते. लगेच कामाला सुरुवात केली होती. परंतु मध्येच काम बंद झाले.
गेल्या वर्षांपासून पुन्हा कामाला सुरुवात करण्यात आली असली तरी, कामात प्रगती नाही. बाथरूम ,शौचालय व पाण्याच्या नियोजनाचा पत्ता नाही. संबंधित बांधकाम विभागाच्या उदासीनतेने व्यायाम शाळेचे काम रेंगाळत असल्याचे युवकात बोलले जात आहे.
बांधकाम त्वरित पूर्ण करून व्यायाम शाळा युवकाकरिता सुरु करावी, अशा प्रकारचे निवेदन येथील सेवन स्टार क्रीडा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांना दिले आहे.