घुग्घुसनजीकच्या नकोडा गावातील फुकट नगरमधील शिब्बु शर्मा व दीपक शर्मा या दोघा भावांत २० जुलै २०१८ रोजी सायंकाळी ६ च्या दरम्यान शुल्लक कारणावरून वादा झाला. दरम्यान, रागाच्याभरात लहान भाऊ दीपक शर्माने मोठा भाऊ शिब्बूवर कुऱ्हाडीने वार केला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी घुग्घुस पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंदविला. गुन्हे शोध पथकाचे सचिन अल्लेवार व सचिन बोरकर यांनी आरोपीला अटक केली होती.
ठाणेदार आमले यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते. न्यायालयाने साक्षपुरावे तपासून आरोपी दीपक शर्मा याला सात वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व ५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ६ महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.