धावत्या रेल्वेतून पडून उत्तर प्रदेशातील तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:33 IST2021-08-25T04:33:20+5:302021-08-25T04:33:20+5:30

बल्लारपूर(चंद्रपूर) : बल्लारपूर शहरातील किल्ला वॉर्ड ते विसापूर-नांदगाव जाणाऱ्या रस्त्यावर पेपर उद्योगाच्या नाल्यावर रेल्वे लाइनजवळ एका तरुणाचा मृतदेह आढळला. ...

A young man from Uttar Pradesh died after falling from a running train | धावत्या रेल्वेतून पडून उत्तर प्रदेशातील तरुणाचा मृत्यू

धावत्या रेल्वेतून पडून उत्तर प्रदेशातील तरुणाचा मृत्यू

बल्लारपूर(चंद्रपूर) : बल्लारपूर शहरातील किल्ला वॉर्ड ते विसापूर-नांदगाव जाणाऱ्या रस्त्यावर पेपर उद्योगाच्या नाल्यावर रेल्वे लाइनजवळ एका तरुणाचा मृतदेह आढळला. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता रेल्वेने प्रवास करताना धावत्या रेल्वेतून तोल जाऊन हा तरुण पडल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. मोहम्मद नन्हे अब्दुल हकीम (२६) रा. रचैता, असमौली, संभल, उत्तर प्रदेश असे मृतकाचे नाव असल्याची माहिती त्याच्याजवळ असलेल्या आधारकार्डवरून मिळाली आहे. मृतकाजवळ रेल्वेचे प्लॅटफॉर्म तिकीटही आढळून आले. बल्लारपूर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ओळख होण्यासाठी ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे ठेवण्यात आला आहे. बल्लारपूर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद रासकर करीत आहे.

Web Title: A young man from Uttar Pradesh died after falling from a running train