तीन वर्षांच्या मुलाचा डोळा वाचविण्यासाठी ‘ते’ तरूण सरसावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:34 IST2021-01-08T05:34:42+5:302021-01-08T05:34:42+5:30
कोरपना येथील नरसिंग गोतावळे यांचा तीन वर्षांचा नातू सोपान हा खेळत असताना अचानक त्यांच्या डोळ्यात काडी गेली. डोळ्याला गंभीर ...

तीन वर्षांच्या मुलाचा डोळा वाचविण्यासाठी ‘ते’ तरूण सरसावले
कोरपना येथील नरसिंग गोतावळे यांचा तीन वर्षांचा नातू सोपान हा खेळत असताना अचानक त्यांच्या डोळ्यात काडी गेली. डोळ्याला गंभीर इजा झाली. शस्त्रक्रिया करावी लागेल, असे डॉक्टरांनी सागितले. आर्थिक स्थिती नाजूक असल्यामुळे शस्त्रक्रियेचा खर्च आवाक्याच्या बाहेर होता. ही माहिती युवा प्रतिष्ठानला कळताच
त्यांनी तीस हजार रुपयांची तत्काळ मदत केली. तसेच शस्त्रक्रियेची पूर्ण व्यवस्था करून दिली. या मदतीमुळे त्या चिमुकल्या मुलाच्या शस्त्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला.
अशाच प्रकारे काही दिवसांपूर्वी कोरपना तालुक्यातील निमणी येथील एका कॅन्सरग्रस्त महिलेलासुद्धा ४१ हजार रुपये रोख मदत करून उपचाराची व्यवस्था करून दिली होती. युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन बावणे, अफजल भाई, अवताडे पाटील, मईनुद्दीन, प्रफुल्ल मालेकर, दिलीप जाधव, श्रीकांत लोडे, अमोल लोडे, वैभव डोके, आकाश राजूरकर, सूरज खोबरकर, आशिष मेश्राम, नावेद, कृष्णा, नईम भाई, रहीम भाई, नवाजी, प्रवीण बांदुरकर, किशोर आस्वले, गणेश काकडे, अविनाश वाभीटकर, प्रशांत बुरेवार, रहिम, गणेश पारखी, अभिनंदन वाघमारे, दशरथ तोगरे ही तरुण मंडळी मदतीसाठी तत्परता दाखवित असल्याने त्यांचे कौतुक होत आहे.