रेल्वेच्या धडकेत युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:52 IST2021-02-18T04:52:34+5:302021-02-18T04:52:34+5:30
विसापूर : नितीन मनोहर दिघोरे (२९) या युवकाचा रेल्वे पुलावर मालगाडीच्या जबर धडकेने जागेवरच मृत्यू झाला. ही ...

रेल्वेच्या धडकेत युवकाचा मृत्यू
विसापूर : नितीन मनोहर दिघोरे (२९) या युवकाचा रेल्वे पुलावर मालगाडीच्या जबर धडकेने जागेवरच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी २.४५ वाजता घडली.
अपघात इतका भीषण होता की या धडकेत नितीनचा डावा पाय तुटून शरीरापासून वेगळा झाला. अपलाईन पोल क्रमांक ८८५/० ते ८८५/१ दरम्यान विसापूर स्मशानभूमीजवळील पुलावर घडली. युवकाचे स्वतःचे चिकन सेंटर असून तो हसमुख स्वभावाचा होता. कोणत्या कारणामुळे रेल्वे पुलावर गेला, हे अजूनही कळले नाही. हा अपघाती मृत्यू की आत्महत्या, याबाबतचा सध्या कोणताच पुरावा मिळाला नाही. विसापूर पोलिसांनी मर्ग दाखल करून मृतदेह शवविच्छेदनासाठी बल्लारपूरला हलविला. पुढील तपास बल्लारपूर पोलीस विभाग अंतर्गत विसापूर पोलीस करत आहे.