शहरं
Join us  
Trending Stories
1
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
2
पुण्यातील लोणी काळभोरमध्ये लागले इराणचे झेंडे, खामेनींचे फ्लेक्स; Video व्हायरल...
3
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
4
PF मधून पैसे काढायचेत? पहिले जाणून घ्या तुमच्या कंपनीनं केलंय की नाही 'हे' काम? नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट
5
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
6
Job Alert: पाच अशा नोकऱ्या, ज्या येत्या काळात संपून जातील; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा इशारा
7
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
8
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
9
"सत्यनारायण पूजेसाठी दिवसभर उपवास अन् नंतर...", शेफालीचा पती पराग त्यागीने दिली माहिती
10
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
11
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
12
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...
13
Share Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; ट्रेंट, इटर्नलमध्ये तेजी; एनटीपीसी, Reliance घसरले
14
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
15
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
16
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
17
Paresh Rawal : "आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?
18
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
19
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
20
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका

वाढदिवसाच्या पूर्वसंध्येलाच 'त्याला' मृत्यूने कवटाळले, कुटुंबावर शोककळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 14:52 IST

वाढदिवशीच नितेशवर कुटुंबीयांनी केला अंत्यसंस्कार

वरोरा (चंद्रपूर) : उद्या वाढदिवस आहे, तो कसा साजरा करायचा असा बेत आखत असताना वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला त्याला मृत्यूने कवटाळले. तलावाच्या पाळीवर झोपलेल्या या युवकाचा तलावातच बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली.

नितेश नत्थुजी मानगुडधे (३०, रा. गुडगाव) असे मृताचे नाव आहे. वीज वितरण कंपनीच्या वरोरा विभागीय कार्यालय अंतर्गत येणाऱ्या वरोरा तालुक्यातील नागरी येथील वीज वितरण केंद्रावर नितेश नत्थुजी मानगुडधे हा तंत्र निदेशक या पदावर कार्यरत होता. तो मूळचा भद्रावती तालुक्यातील गुडगाव येथील रहिवासी होता. नितेश गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत असताना एक अपघात झाला. त्या अपघातात त्याला आपला हात गमवावा लागला. कार्यालयीन कामकाज काही वर्षापासून तो एकाच हाताने करीत होता. नितेश विवाहित होता. मंगळवारी तो काही कामानिमित्त वरोरा शहरात आला होता.

वरोरा शहरातील मध्यभागी असलेल्या तलावाच्या पाळीवर वडाच्या झाडाखाली तो झोपला होता. झोपेतच तो पाळीवरून तलावात पडला. एकच हात असल्यामुळे त्याला आपला बचाव काही करता आला नाही. त्यामुळे तलावात बुडून त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांनी दिली. नितेशचा १ नोव्हेंबरला वाढदिवस होता. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर वाढदिवसाच्या दिवशीच त्याच्यावर त्याच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्याचा दुर्दैव प्रसंग त्याच्या कुटुंबावर आला. याप्रकरणी वरोरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास वरोरा पोलिस करीत आहे.

टॅग्स :drowningपाण्यात बुडणेDeathमृत्यूchandrapur-acचंद्रपूर