सिंदेवाहीत बसपातर्फे युवा उद्योजक मार्गदर्शन शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:20 IST2021-01-10T04:20:34+5:302021-01-10T04:20:34+5:30
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बहुजन समाज पार्टीचे अध्यक्ष नंदू खोब्रागडे होते तर प्रमुख अतिथी म्हणून बहुजन विद्यार्थी संघाचे अध्यक्ष सचिन ...

सिंदेवाहीत बसपातर्फे युवा उद्योजक मार्गदर्शन शिबिर
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बहुजन समाज पार्टीचे अध्यक्ष नंदू खोब्रागडे होते तर प्रमुख अतिथी म्हणून बहुजन विद्यार्थी संघाचे अध्यक्ष सचिन शेंडे व तज्ज्ञ मार्गदर्शक मुंबईचे उद्योजक सतीश गौतम उपस्थित होते. या तालुकास्तरीय युवा उद्योजक मार्गदर्शन शिबिरात सतीश गौतम यांनी उपस्थित बहुजन समाजातील ओबीसी, एससी, एसटी युवा तरुण विद्यार्थीवर्गाला या क्षेत्रातील विविध संधी, स्रोत व सरकारी योजना आदीं विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.
तत्पूर्वी आयोजकांच्या वतीने सर्व अतिथी यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर इंजि. सचिन शेंडे यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले, तर आभार तेजस डोंगरे यांनी मानले. याप्रसंगी सहभागी सर्व शिबिरार्थींना पेन व नोटबुक वितरित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नंदू नागदेवते,विलास शेंडे,प्रशांत नागदेवते आदींनी सहकार्य केले.