काळ्या पट्ट्या लावून यंग चांदा ब्रिगेडने केली निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:51 IST2021-03-13T04:51:21+5:302021-03-13T04:51:21+5:30

चंद्रपूर : एमपीएससी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अनेक ठिकाणी आंदोलन केले. त्याचाच ...

Young Chanda Brigade protests with black stripes | काळ्या पट्ट्या लावून यंग चांदा ब्रिगेडने केली निदर्शने

काळ्या पट्ट्या लावून यंग चांदा ब्रिगेडने केली निदर्शने

चंद्रपूर : एमपीएससी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अनेक ठिकाणी आंदोलन केले. त्याचाच एक भाग म्हणून यंग चांदा ब्रिगेड व स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी चंद्रपूर येथील गांधी चौकात काळ्या पट्ट्या लावून निदर्शन केले. यावेळी आमदार जोरगेवार यांनी या ठिकाणी भेट दिली.

यापूर्वीसुद्धा तीनदा परीक्षा रद्द करण्यात आल्या. आज चौथ्यांदा ऐन वेळेवर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये मोठा रोष व्यक्त केल्या जात आहे. हा घेतलेला निर्णय रद्द करून ठरलेल्या वेळेवर परीक्षा घ्यावी, अशी मागणी आमदार जोरगेवार यांनी केली आहे. शासनाने हा घेतलेला निर्णय त्वरित मागे घेऊन ठरलेल्या वेळेतच परीक्षा घेण्यात याव्या, अशी मागणी आमदार जोरगेवार यांनी केली आहे.

Web Title: Young Chanda Brigade protests with black stripes