योग संदेश व त्याचे महत्त्व शिक्षकांनी जनसामान्यापर्यंत पोहचवावे - आनंदपवार

By Admin | Updated: June 16, 2015 01:17 IST2015-06-16T01:17:16+5:302015-06-16T01:17:16+5:30

विद्यार्थ्यांना बालपणी दिले जाणारे संस्कार हे चिरकाल टिकणारे असल्याने शिक्षकांनी बालपणापासून योगाचे धडे देण्याचे

Yoga message and its importance should be taught to the masses - Happy Sunday | योग संदेश व त्याचे महत्त्व शिक्षकांनी जनसामान्यापर्यंत पोहचवावे - आनंदपवार

योग संदेश व त्याचे महत्त्व शिक्षकांनी जनसामान्यापर्यंत पोहचवावे - आनंदपवार

चंद्रपूर : विद्यार्थ्यांना बालपणी दिले जाणारे संस्कार हे चिरकाल टिकणारे असल्याने शिक्षकांनी बालपणापासून योगाचे धडे देण्याचे पवित्र कार्य करावे. तसेच योग संदेश व त्याचे महत्त्व जनसामान्यापर्यंत पोहचवावे, असे आवाहन चंद्रपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तथा तालुका योग समितीचे नियंत्रक राजू आनंदपवार यांनी केले.
चंद्रपूर पंचायत समितीअंतर्गत सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांची २१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्या संदर्भात स्थानिक पंचायत समितीच्या कृषक भवनात शनिवारी एक दिवसीय नियोजन सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून तालुका योग समितीचे समन्वयक तथा चंद्रपूर पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी बाबुराव मडावी उपशिक्षणाधिकारी धनपाल फटींग, योग समितीचे अशोक संगीडवार, गुणवंत गोगुलवार, विजय चंदावार, जेणेकर व अधिव्याख्याता जयपूरकर आदींची उपस्थिती होती. त्यांनीही याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करून योगाचे महत्व सांगितले. संचालन विस्तार अधिकारी वर्षा फुलझेले यांनी केले. (प्रतिनिधी)

Web Title: Yoga message and its importance should be taught to the masses - Happy Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.