येरगावच्या सरपंचांवर प्राणघातक हल्ला

By Admin | Updated: July 16, 2015 01:19 IST2015-07-16T01:19:21+5:302015-07-16T01:19:21+5:30

तालुक्यातील येरगाव येथील सरपंच संजय फुलझेले यांना जातिवाचक शिविगाळ करून उभारीने डोक्यावर मारहाण करून गंभीर जखमी केले.

Yergaon's Sarpanchs suffered a deadly attack | येरगावच्या सरपंचांवर प्राणघातक हल्ला

येरगावच्या सरपंचांवर प्राणघातक हल्ला

मूल : तालुक्यातील येरगाव येथील सरपंच संजय फुलझेले यांना जातिवाचक शिविगाळ करून उभारीने डोक्यावर मारहाण करून गंभीर जखमी केले. यात फुलझेले यांच्या तक्रारीवरून ११ जणांवर अ‍ॅट्रासिटी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकार आॅगस्ट महिन्यात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीवरून घडल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
मूल तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. त्यामुळे राजकीय वैमनस्य निर्माण होत असल्याचे दिसून येते. तालुक्यातील येरगाव येथे सकाळी ७ वाजतादरम्यान सरपंच संजय फुलझेले यांच्यावर उभारीने प्राणघातक हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. आरोपीमध्ये प्रदीप मुर्लीधर नागापुरे, अजय छबीदास थोरात, प्रमोद छब्बीदास थोरात, बंडु डोमाजी राऊत, विवेक सुरेश नागापुरे, राजु सुरेश नागापुरे, उमदेव मारोती देशमुख, मुर्लीधर काशिनाथ नागपुरे, विश्वेश्वर मारोती मडावी, निलकंठ दोडकु काटवले, अजय विश्वेश्वर मडावी आदीचा समावेश आहे. आरोपीवर कडक कारवाई करावी, यासाठी श्रमिक एल्गारच्या अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांनी पोलीस उपविभागीय अधिकारी बी.बी. महामुनी यांच्याकडे मागणी केली. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Yergaon's Sarpanchs suffered a deadly attack