चुकीच्या अहवालाने २५ लाखांचा खर्च व्यर्थ

By Admin | Updated: May 25, 2014 23:29 IST2014-05-25T23:29:00+5:302014-05-25T23:29:00+5:30

नॉन हाचकिन्स लिंफोमा कॅन्सर’ या आजाराने ग्रस्त असताना २३ वर्षीय इंदरसिंह वधावन या रुग्णास ‘हाचकिन्स लिंफोमा’ (कॅन्सर) आजार असल्याचा चुकीचा अहवाल देणार्‍या लॅब संचालकांवर

Wrong reports cost 25 lakhs worthless | चुकीच्या अहवालाने २५ लाखांचा खर्च व्यर्थ

चुकीच्या अहवालाने २५ लाखांचा खर्च व्यर्थ

चंद्रपूर : नॉन हाचकिन्स लिंफोमा कॅन्सरया आजाराने ग्रस्त असताना २३ वर्षीय इंदरसिंह वधावन या रुग्णास हाचकिन्स लिंफोमा’ (कॅन्सर) आजार असल्याचा चुकीचा अहवाल देणार्‍या लॅब संचालकांवर कारवाई करून त्यांची अनुज्ञप्ती परवाना रद्द करण्याची मागणी रुग्णांचे वडील हरचरणसिंह वधावन यांनी पत्रकार परिषदेत केली.हाचकिन्स लिंफोमाआजार झाल्याचे निदान व लॅब अहवाल २0१२ ला चंद्रपूर येथील डॉ. चिद्दरवार यांनी दिला होता. याच अहवालाशी साधम्र्य असणारा अहवाल एस.आर.एल. लेबॉरेटरी नागपूर शाखेमार्फत मुंबई येथील एम.आर.एल. लॅबने दिला. चुकीच्या अहवालाला अनुसरून तब्बल वर्षभर इंदरसिंह याच्यावर किमोथेरपीद्वारा उपचार करण्यात आला. या दरम्यान ११ किमोथेरेपी करण्यात आल्या.२0१३ मध्ये रुग्णाच्या शरीराला गाठी उद्भवल्याने डॉ. वरगंटीवार यांच्या दवाखान्यात गाठीची शस्त्रक्रिया करून गाठी डॉ. चिद्दरवार यांच्या लॅबमध्ये परीक्षणाकरिता पाठविल्या. तेव्हासुद्धा त्यांनी हाचकिन्स लिंफोमाकॅन्सरचा आजार असल्याचा अहवाल दिला. आजार पुन्हा उद्भवल्याने नागपूरच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णाला बंगलोर येथील एच.सी.एल. कॅन्सर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा डॉक्टरांनी डॉ. चिद्दरवार यांनी तपासलेल्या गाठी व त्याचे स्लाइड बंगलोर येथे मागवून त्या गाठी तपासून रुग्णास हाचकिन्स लिंफोमा हा आजार नसून नॉन हाचकिन्स लिंफोमाआजार जडल्याचे सांगितले. त्यावर बोनमेरो ट्रान्सप्लांट ही उपचारपद्धती असून, हेवी किमा करून आजारावर प्रतिबंध घालणे शक्य असल्याचे सांगितले. पॅथॉलॉजिस्टच्या चुकीच्या निदानामुळे व त्यांनी दिलेल्या चुकीच्या अहवालामुळे उपचारासाठी २५ लाख रुपये पाण्यात गेले. या कालावधीत मानसिक, आर्थिक व प्रचंड शारीरिक त्रास सहन करावा लागल्याने याची भरपाई द्यावी, अन्यथा कायदेशीर दावा ठोकणार असल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित लॅब चालकावर रुग्णाच्या उपचाराकरिता विनाकारण खर्च झालेल्या २५ लाखांसह मानसिक व आर्थिक त्रासापोटी ५0 लाख, असा एकूण ७५ लाख रुपयांचा कायदेशीर दावा दाखल करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. वधावन यांनी सांगितले, मुलगा इंदरसिंह वधावन यास

यासंदर्भात संबंधितांशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Wrong reports cost 25 lakhs worthless

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.