६० वर्षांपासूनची कुस्ती परंपरा कायम

By Admin | Updated: November 14, 2015 01:20 IST2015-11-14T01:20:04+5:302015-11-14T01:20:04+5:30

दिवाळीचा सण म्हणजे गोडधोड करुन फटाक्याची आतिषबाजी करणे, एवढेच या सणाला महत्त्व दिले जाते.

The wrestling tradition of 60 years has changed | ६० वर्षांपासूनची कुस्ती परंपरा कायम

६० वर्षांपासूनची कुस्ती परंपरा कायम


ब्रह्मपुरी : दिवाळीचा सण म्हणजे गोडधोड करुन फटाक्याची आतिषबाजी करणे, एवढेच या सणाला महत्त्व दिले जाते. परंतु पेठवार्डमध्ये ६२ वर्षांपासून कुस्तीची स्पर्धा घडवून विजेत्यांना बक्षिस देऊन गौरविण्याची परंपरा अजूनही कायम आहे.
पेठवार्डमध्ये कुस्ती स्पर्धा ही एखाद्या जत्रेप्रमाणे भरत असते. स्व. जैरामजी बगमारे यांच्या कल्पकतेतून ६२ वर्षांपूर्वी कुस्ती स्पर्धा भरायला सुरुवात झाली. आजही ही स्पर्धा नवीन पिढीने कायम ठेवली आहे. कुस्तीसाठी पहेलवान या क्षणाची वाट पाहत असतात. मौशी, विलम, कुर्झा, पारडी, उदापूर, मालडोंगरी, खरबी (माहेर) व आजू बाजूच्या २० कि.मी. पर्यंतच्या परिसरातून पहेलवान या कुस्त्यांच्या क्षणाची व दिवाळीच्या पाडव्याची आतुरतेने वाट पाहात असतात. या कुस्तीच्या स्पर्धेसाठी जवळजवळ १०० ते १५० कुस्तीपटू मैदानात दरवर्षी उतरत असतात. गुरुदेव सेवा मंडळ व बजरंग व्यायाम मंडळ यांच्या संयुक्त उपक्रमातून ६२ वर्षांपासून ही परंपरा कायम ठेवण्यात आली आहे. लोकवर्गणीतून ही कुस्ती स्पर्धा भरवली जाते. पुर्वजांंनी सुरू केलेली ही प्रथा दिवाळीच्या गायगोदनच्या दिवशी मोठ्या उत्साहात पार पडली जाते. प्रेक्षकांची या कार्यक्रमाला मोठी गर्दी होत असते. कुस्तीपटू विजेत्यांना वस्तुरुपात बक्षिस देण्याची परंपरा आजही कायम आहे. एवढेच नव्हे तर कुस्तीमंडळाला रोख रकमेच्या स्वरुपात भेट देण्याची परंपराही आहे. या कुस्ती स्पर्धेसाठी नामांकित पाहुणे उद्घाटन तसेच बक्षिस वितरणाला बोलविल्या जात असते. या निमित्ताने पेठवार्डात घरोघरी पाहुण्यांची रेलचेल असते. या निमित्ताने ब्रह्मपुरीची आगळीवेगळी ओळख आजूबाजूच्या परिसरात झालेली आहे. जुनी संस्कृती टिकवून ठेवण्याचे काम या वॉर्डातील नागरिकांच्या सहकार्याने अजूनही होत आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The wrestling tradition of 60 years has changed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.