ऊर्जानगरमध्ये जागतिक महिला दिन साजरा
By Admin | Updated: March 20, 2015 01:12 IST2015-03-20T01:12:40+5:302015-03-20T01:12:40+5:30
ऊर्जानगर येथे ८ मार्चला जागतिक महिलादिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

ऊर्जानगरमध्ये जागतिक महिला दिन साजरा
ऊर्जानगर: ऊर्जानगर येथे ८ मार्चला जागतिक महिलादिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वनिता कानडे तर प्रमुख अतिथी म्हणून सुभाष कासनगोट्टूवार, किरण बुटले, किसन अरदळे, पूजा ठाकरे उपस्थित होत्या. वनिता कानडे यांनी जागतिक महिला दिनाचे महत्व सोप्या भाषेत महिलांना सांगितले. किरण बुटले, किसन अरदळे, सुभाष कासनगोट्टूवार यांनी कार्यक्रमाला सहकार्य केले. यावेळी दिवाकर देशमुख यांनी ‘वऱ्हाडी ठसका’ हा कार्यक्रम सादर केला.
यावेळी सखींनी टेक इट इझी हे नाट्य सादर केले. रांगोळी स्पर्धेमध्ये अंजू पांडे, लता तोतडे, डिंपल पेंदाम अडवे यांनी बक्षिसे मिळविली. पाककला स्पर्धेमध्ये सोनाली खंडाते, विद्या अरवट, अडवे, प्रोत्साहनपर पूरस्वानी, पुष्परचना सजावटीमध्ये वैशाली जाधव, लता रहाटे, सोनल रहाटे, प्रोत्साहनपर प्रगती मडावी, एकल नृत्यामध्ये अ गटामध्ये सायली देठे, पूजा आलाम, गीता माहुलकर, ब गटामध्ये प्रणोती भट, सृष्टी गडेकर, प्रियंका झोराते, समूह नृत्यामध्ये मृणाली ग्रुप, बी. के. एस. ग्रुप, बेबी डॉल ग्रुप, आदींनी बक्षिस मिळविले. संचालन प्राची देशपांडे यांनी तर आभार संजना कांबळे यांनी मानले. परिक्षक म्हणून मनिषा देशमुख, पुष्पा काळे, प्रतिभाा जांभोरे, कल्पना बन्सोड यांनी जबाबदारी सांभाळली.
कार्यक्रम यशस्वीतेकरिता हेमलता झटाले, सीमा तिवसकर, उज्वला चौखंडे, रंजनी टाकसाळे, विजया तवर, रंजना टाकसाळे, वैशाली बलकी यांच्यासह सखींनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)