सुमठाणा येथे जागतिक ‘जल दिन’ कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:26 IST2021-03-25T04:26:36+5:302021-03-25T04:26:36+5:30
सामाजिक वनीकरण विभाग राजुरातर्फे जागतिक ‘वन दिन’ व ‘जल दिना’चे औचित्य साधून आधुनिक रोपवाटिका सुमठाणा येथील रोपवाटिकेत विद्यार्थ्यांना वृक्ष ...

सुमठाणा येथे जागतिक ‘जल दिन’ कार्यक्रम
सामाजिक वनीकरण विभाग राजुरातर्फे जागतिक ‘वन दिन’ व ‘जल दिना’चे औचित्य साधून आधुनिक रोपवाटिका सुमठाणा येथील रोपवाटिकेत विद्यार्थ्यांना वृक्ष लागवड, वृक्ष संगोपन, विविध प्रजातीच्या वृक्षाची माहिती, रोप तयार करण्याच्या प्रक्रियेविषयी माहिती देण्यात आली.
अध्यक्षस्थानी आदर्श शाळेचे राष्ट्रीय हरित सेना विभागप्रमुख बादल बेले यांची उपस्थिती होती; तर प्रमुख अतिथी म्हणून वनाधिकारी उमेश जंगम, उपसरपंच ताकसांडे, सुनील झाडे, अनिल नन्नावरे यांची उपस्थिती होती.
सुरुवातीला श्रुती रायपुरे, डिंपल झाडे, अनुष्का केशट्टीवार या विद्यार्थिनींनी पर्यावरण संवर्धन व पाण्याचे संगोपन यावर मनोगत व्यक्त केले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी जागतिक वन दिन व जल दिनाचे महत्त्व विषद केले. उमेश जंगम व विलास कुंदोजवार यांनी आधुनिक रोपवाटिकेतील वृक्ष लागवड, रोप निर्मिती प्रक्रिया, वृक्ष संवर्धन, विविध प्रजातींच्या झाडाची नावे व त्यांचे उपयोग याविषयी सविस्तरपणे माहिती दिली. संचालन विलास कुंदोजवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता आदर्श हायस्कूल येथील राष्ट्रीय हरित सेना विभागाच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.