लैंगिक छळ संरक्षण कायद्याबाबत कार्यशाळा
By Admin | Updated: March 19, 2017 00:37 IST2017-03-19T00:37:10+5:302017-03-19T00:37:10+5:30
श्री शिवाजी महाविद्यालय राजुरा येथे महिला तक्रार निवारण समितीच्या वतीने कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ संरक्षण या विषयावर कार्यशाळा गुरुवारला पार पडली.

लैंगिक छळ संरक्षण कायद्याबाबत कार्यशाळा
राजुरा : श्री शिवाजी महाविद्यालय राजुरा येथे महिला तक्रार निवारण समितीच्या वतीने कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ संरक्षण या विषयावर कार्यशाळा गुरुवारला पार पडली.
यावेळी कार्यशाळेचे मार्गदर्शक अॅड. अरुण धोटे यांनी कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ संरक्षण अधिनियम २०१३ या कायद्यातील विविध तरतुदीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डी.बी. भोंगळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून महिलांसाठी असलेल्या कायद्याचा योग्य वापर करून महिलांनी अन्याय व अत्याचाराविरुद्ध लढा दिलाच पाहिजे असे प्रतिपादन केले. या कार्यशाळेचे प्रास्ताविक महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. चेतना भोंगडे यांनी केले. बी.एस.सी. भाग दोनच्या विद्यार्थीनी डिम्पल साळवे हिने कार्यशाळेचे संचालन तसेच आभारप्रदर्शन आयुषी हिवरे हिने केले.
या कार्यशाळेला राजुरा शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयातील महिला कर्मचारी सहभागी झाल्या होत्या. तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी बहुसंख्य संख्येने उपस्थित होत्या. कार्यशाळेच्या यशस्वीतेकरिता प्रा. उलमाले, डॉ. खेरोणी, प्रा. वंजारी, डॉ. रणधीर, प्रा. धोंगडे, अर्चना देठे तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले. (शहर प्रतिनिधी)
तहसील कार्यालयात जागतिक ग्राहकदिन
राजुरा : राजुरा तहसील कार्यालयात जागतिक ग्राहकदिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार धर्मेश फुसाटे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ पत्रकार डॉ.उमाकांत धोटे, अन्न पुरवठा निरीक्षक सविता गंभिरे, प्रवीण गावंडे उपस्थित होते. देशात तसेच जागतिक पातळीवर ग्राहकदिन साजरा करण्यात येतो. (शहर प्रतिनिधी)