कोरपना व पोंभुर्णा येथे आज आधुनिक शेतीबाबत कार्यशाळा
By Admin | Updated: June 7, 2015 01:06 IST2015-06-07T01:06:39+5:302015-06-07T01:06:39+5:30
कृषी जीवन विकास प्रतिष्ठान येनबोडी व स्कॉलर सर्च अकॅडमी कोरपनाद्वारा आधुनिक शेतीबाबत कार्यशाळेचे आयोजन ....

कोरपना व पोंभुर्णा येथे आज आधुनिक शेतीबाबत कार्यशाळा
कान्हाळगाव (कोरपना) : कृषी जीवन विकास प्रतिष्ठान येनबोडी व स्कॉलर सर्च अकॅडमी कोरपनाद्वारा आधुनिक शेतीबाबत कार्यशाळेचे आयोजन रविवारी ७ जूनला २ वाजता स्थानिक ग्रामप्रबोधिनी परिसरात कोरपना येथे आयोजन करण्यात आले आहे. तर पोंभुर्णा येथे सकाळी १० वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात ही कार्यशाळा पार पडणार आहे.
कोरपना येथील कार्यशाळेच्या उद्घाटन केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर यांचे हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. बाबासाहेब वासाडे तर प्रमुख पाहुणे म्हणून राजुऱ्याचे आमदार संजय धोटे, माजी आमदार प्रभाकर मामुलकर, सुदर्शन निमकर, अण्णासाहेब पोशेट्टीवार, नितीन कुळकर्णी, प्रशांत वासाडे, सी.डी. मई, डॉ. शरद पवार, डॉ. सुनिल सहानपुरे, माजी आमदार अशोक मानकर, रमेश मानकर आदी उपस्थित राहणार आहे. या कार्यशाळेत आधुनिक शेतीचे तंत्रज्ञान भातशेती, फलोद्यान, दुग्ध व्यवसाय, ठिंबक सिंचन, शासकिय शेतीविषयक योजना व सवलती, कृषी शास्त्रज्ञ व प्रगतीशील शेतकरी यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
आयोजित कार्यशाळेचा शेतकऱ्यांनी लाभ ग्यावा असे आव्हान कृषी जीवन विकास प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ. देवानंद गुरू, विजय वासाडे, सर्च फाऊंडेशनचे अध्यक्ष इंजि. दिलीप झाडे, गोपाळराव सातपुते यांनी केले आहे.
पोंभुर्णा येथे आयोजित कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी अॅड.बाबासाहेब वासाडे राहतील, तर उद्घाटन सुगंधित भातशेतीचे जनक अण्णासाहेब पोशेट्टीवार यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शास्त्रज्ञ सी.डी.मई, डॉ.सुनिल सहातपुरे, यशोदीप गिरसे, डॉ.शरद पवार, अशोक मानकर, नितीन कुळकर्णी, व बिआयचे संचालक प्रशांत वासाडे उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. (वार्ताहर)