कामधेनु योजनेची गोरजा येथे कार्यशाळा
By Admin | Updated: April 23, 2016 00:57 IST2016-04-23T00:57:53+5:302016-04-23T00:57:53+5:30
जिल्हा परिषद चंद्रपूर पशुसंवर्धन विभागामार्फत कामधेनु दत्तक ग्राम योजना पशुवैद्यकीय दवाखाना घोडपेठ अंतर्गत मौजा गोरजा येथे कार्यसंकल्प पुर्तीकरिता कार्यशाळा घेण्यात आली.

कामधेनु योजनेची गोरजा येथे कार्यशाळा
घुग्घुस : जिल्हा परिषद चंद्रपूर पशुसंवर्धन विभागामार्फत कामधेनु दत्तक ग्राम योजना पशुवैद्यकीय दवाखाना घोडपेठ अंतर्गत मौजा गोरजा येथे कार्यसंकल्प पुर्तीकरिता कार्यशाळा घेण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष भास्कर गायकवाड होते. उद्घाटन सरपंच संगीता नळे यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून पशुधन विकास अधिकारी डॉ. शेख, डॉ. पवार, डॉ. नंदकिशोर मैंदळकर, कामधेनु अध्यक्ष महेश ठेंगणे, डॉ. राहुल धीवे, भाऊराव गायकवाड उपस्थित होते.
कामधेनु दत्तक ग्राम योजना गोरजा येथे वर्षेभर राबविण्यात आली. त्यात गावातील ग्रामवासीयांना जनावरांच्या आरोग्याविषयी व सेंद्रीय शेतीविषयी माहिती देण्यात आली. मलमुत्रापासून सेंद्रीय शेणखत बनविणे, वाया जाणाऱ्या निकृष्ठ चाऱ्यापासून सकस व उत्कृष्ठ चारा बनविणे, अॅझोला या वनस्पतीचे संवर्धन करून जनावरांना खाण्यायोग्य बनविणे, गोठे निर्जंतुकीकरण करणे, जंतनाशकीकरण करणे, ग्रामशिबिर घेऊन आरोग्यविषयी जनजागरण व आरोग्य तपासणी घेण्यात आली. कामधेनु मंडळाच्या सदस्यांना नागपूर येथे शैक्षणिक सहल नेण्यात आली. प्रास्ताविक डॉ. नंदकिशोर मैंदळकर यांनी केले तर संचालन डॉ. राहुल धीवे यांनी केले. आभार संगीत नळे यांनी मानले. (वार्ताहर)