बेरोजगारीला कंटाळून कामगाराची आत्महत्या

By Admin | Updated: May 14, 2016 00:45 IST2016-05-14T00:45:29+5:302016-05-14T00:45:29+5:30

कर्नाटका एम्टा खुल्या कोळसा खाणीतील प्रकल्पग्रस्त कामगाराने कंपनी बंद अवस्थेत व १४ महिन्यापासून वेतन मिळत नसल्याने हताश होऊन ...

Worker's suicide due to untimely unemployment | बेरोजगारीला कंटाळून कामगाराची आत्महत्या

बेरोजगारीला कंटाळून कामगाराची आत्महत्या

भद्रावती : कर्नाटका एम्टा खुल्या कोळसा खाणीतील प्रकल्पग्रस्त कामगाराने कंपनी बंद अवस्थेत व १४ महिन्यापासून वेतन मिळत नसल्याने हताश होऊन गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना गुरूवारी सकाळी ८ वाजता बरांज गावात घडली.
नीलेश गोकुलदास निखाडे (२६) रा. बरांज असे आत्महत्याग्रस्त युवकाचे नाव आहे. सकाळी ८ वाजता त्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेतली. ही बाब वडीलाच्या लक्षात येताच त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
भद्रावती पोलिसांनी मर्ग दाखल करून वडीलाला मृत्यूचे कारण विचारले असता, माझा मुलगा हा प्रकल्पग्रस्त म्हणून कर्नाटक एम्टाच्या कंपनीमध्ये कामावर होता. परंतु, गेल्या १४ महिन्यापासून कंपनी बंद अवस्थेत असल्याने त्याचे वेतन बंद होते तसेच हातचे काम गेल्याने तो बेरोजगारीने त्रस्त होता, असे सांगितले.
एम्टा कंपनीच्या कामगाराना ही घटना माहिती होताच सर्व कामगरांनी एकत्र येऊन आम्हाला काम व वेतन द्यावे. वेतन न दिल्यास सामूहिक आत्महत्या करण्याचा इशारा एम्टाच्या सर्व कामगारांनी एम्टा प्रशासन तथा शासन, प्रशासनाला दिला आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Worker's suicide due to untimely unemployment