शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
2
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
3
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
4
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
5
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
6
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
7
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
8
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
9
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
10
आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
11
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
12
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
13
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
14
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
15
"विवाहित मुलांना वडिलांच्या मालमत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही"; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
16
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
17
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
18
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
19
"तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन..." पापाराझींना पाहताच पहिल्यांदाच वैतागला रोहित शेट्टी, काय म्हणाला?
20
"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकारच्या विरोधात कामगार रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 23:56 IST

राज्य सरकारच्या विविध सरकारी व खासगी कार्यालयात कार्यरत कामगारांनी गुरूवारी रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध नोंदविला. अखिल भारतीय किसान सभा व सीटूच्या वतीने आयोजित या मोर्चात सहभागी शेकडो कामगारांनी गांधी चौकातून जिल्हा परिषदेवर धडक दिली.

ठळक मुद्देचंद्रपुरात जेलभरो आंदोलन : शेकडो महिला व पुरूष कामगारांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्य सरकारच्या विविध सरकारी व खासगी कार्यालयात कार्यरत कामगारांनी गुरूवारी रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध नोंदविला. अखिल भारतीय किसान सभा व सीटूच्या वतीने आयोजित या मोर्चात सहभागी शेकडो कामगारांनी गांधी चौकातून जिल्हा परिषदेवर धडक दिली. त्यानंतर येथे सभा झाली. सभेनंतर शेकडो कामगारांनी जेलभरो आंदोलन करून विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले.मोर्चाचे नेतृत्व प्रा. रमेशचंद्र दहीवडे, प्रल्हाद वाघमारे, वामन बुटले व प्रमोद गोडघाटे यांनी केले. आंदोलनकर्ते कामगार गांधी चौकातून जिल्हा परिषदेवर धडकले. त्यानंतर प्रियदर्शिनी इंदिरा गांधी चौकात कामगारांनी रास्ता रोको करून जेलभरो आंदोलन केले. यात लोकशाही आघाडीचे अंकुश वाघमारे, किशोर पोतनवार, शेख मैकु शहाबुद्दीन, नामदेव कन्नाके, रामसिंह सोहेल, हिराचंद बोरकुटे, प्रा.माधव गुरनुले, अन्वरभाई आलम मिर्झा, अय्युबभाई कच्ची, गोविंद मित्रा, शंकर सोगोरे, पी. एम. जाधव आदींनी जेलभरो आंदोलनाला समर्थन दिला.या जेलभरो आंदोलनात वनजमिनीवर अतिक्रमण करून जमीन कसत असलेले जबरानज्योत शेतकरी, मलेरिया कामगार, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत वनमजूर, संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी महिला-पुरूष, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, पोषण आहार शिजवणाऱ्या महिला, ग्रामीण क्षेत्रात कार्यरत आशा वर्कर, खासगी कार्यालयात कार्यरत कंत्राटी  कामगार, संगठित उद्योग कोलमाइन्सचे कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.अशा आहेत मागण्याजबरानजोत कास्तकारांना जमिनीचे पट्टे द्यावे, स्वामीनाथन कमिटीच्या शिफारशींची अंमलबजावणी करून खर्चावर ५० टक्के नफा असा हमीभाव द्यावा, ६० वर्षावरील सर्व कष्टकऱ्यांना किमान पाच हजार रुपये पेंशन द्यावे, सर्व असंघटीत कामगारांना किमान वेतन १८ हजार रुपये वेतन द्यावे, खाजगीकरणाचा विरोध, ठेकेदारी पद्धती बंद करा, लोकसभा निवडणुकीतील आश्वासनाची अंमलबजावणी करा आदी मागण्यांचे निवेदन शासनाला पाठविण्यात आले.    गटप्रवर्तक व आशा वर्करचे धरणे नागभीड : आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी गुरूवारी धरणे आंदोलन करून तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. राष्ट्रीय आरोग्य अभियान कायमस्वरूपी राबवावे, किमान वेतन १८ हजार तसेच ३ हजार रुपये पेंशन देण्यात यावी, दवाखान्यांचे खाजगीकरण बंद करण्यात यावे, अशा २६ मांगण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी शिष्टमंडळात सुनंदा मुलमुले, दुशाली खोब्रागडे, स्मिता कुंभरे, विद्या जांभूळे, हेमलता नाकाडे, सपना खोब्रागडे, दर्शना मेश्राम, कल्पना मेश्राम यांचा समावेश होता.

टॅग्स :State Governmentराज्य सरकारMorchaमोर्चा