लोकमत न्यूज नेटवर्कमूल : तालुक्यातील शेतकºयांच्या विविध मागण्यांसाठी श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष अॅड. पारोमिता गोस्वामी यांच्या नेतृत्वात मूल येथील वनपरिक्षेत्र कार्यालयावर मंगळवारी मोर्चा काढण्यात आला. यावेळी अधिकाºयांना निवेदन देवून शेतकºयांच्या मागण्या सोडविण्याची मागणी करण्यात आली.रानडुकरांच्या त्रासामुळे शेतकरी जागली जातात. त्यांची मजुरी सरकारने रोजगार हमी मधून द्यावी, तसेच रानडुकराला ठार मारल्यास गुन्हा दाखल करु नये, शेतकºयांना मोफत सोलर कुंपण देण्यात यावा, अशा विविध मागण्या करण्यात आल्या.यावेळी शेतकरी तथा श्रमिक एल्गारचे माजी तालुकाध्यक्ष अरूण जराते, श्रमिक एल्गारचे मूल तालुकाध्यक्ष रवि शेरकी, घनश्याम मेश्राम, विजय सिद्धावार आदींचा सहभाग होता.एल्गार कार्यालय ते वनपरिक्षेत्र कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात तालुक्यातील टेकाडी, डोंगरगाव, पडझरी, चितेगाव, येजगाव, चिखली, पिपरी दीक्षित, चकबेंबाळ, येरगाव, जानाळा, चिरोली येथील शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.मोर्चा यशस्वीतेसाठी श्रमिक एल्गारचे दिनेश घाटे, अमर कड्याम, संगीता गेडाम, विशाल नर्मलवार, रेश्मा गेडाम, रानी भोयर यांच्यासह आदींनी परीश्रम घेतले.
श्रमिक एल्गारची वनपरिक्षेत्र कार्यालयावर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 22:56 IST
तालुक्यातील शेतकºयांच्या विविध मागण्यांसाठी श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष अॅड. पारोमिता गोस्वामी यांच्या नेतृत्वात मूल येथील वनपरिक्षेत्र कार्यालयावर मंगळवारी मोर्चा काढण्यात आला.
श्रमिक एल्गारची वनपरिक्षेत्र कार्यालयावर धडक
ठळक मुद्देशेकडो शेतकºयांचा सहभाग : रानडुकरांच्या बंदोबस्ताची मागणी