कामगारांचा असंतोष रस्त्यावर उतरला
By Admin | Updated: December 6, 2014 01:19 IST2014-12-06T01:19:48+5:302014-12-06T01:19:48+5:30
केंद्र शासन कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात सिटूच्या नेतृत्वात शुक्रवारी भव्य मोर्चा काढण्यात आला.

कामगारांचा असंतोष रस्त्यावर उतरला
चंद्रपूर : केंद्र शासन कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात सिटूच्या नेतृत्वात शुक्रवारी भव्य मोर्चा काढण्यात आला. गांधी चौकातून निघालेल्या या मोर्चात संघटीत तथा असंघटित क्षेत्रातील हजारो कामगार सहभागी झाले होते.
यात अंगणवाडी महिला, विविध उद्योगातील ठेका कामगार, आशा वर्कर, कोलमाईन्स कामगार, वन कामगार, वैद्यकीय प्रतिनिधी, घरेलुु कामगार आदींचा समावेश होता. केंद्र शासन होश मे आओ, केंद्र शासनाचा धिक्कार असो, कामगार विरोधी धोरण हाणून पाडा, सफव्या घोषणा देणे बंद करा, साठ वर्षावरील सर्वांना पेंशन द्या आदी घोषणा देण्यात आल्या.
मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला. यावेळी प्रा. दहिवडे म्हणाले, कामगारांनी दीर्घकाळ लढा दिला. संघर्ष करून आपले बलीदान दिले. कामगारांनी जे अधिकार मिळविले ते काढून घेण्याचा प्रयत्न केंद्रातील मोदी सरकारने चालविला आहे. ज्यांनी यांना निवडणुकीसाठी पोषण आहार दिला. त्याची परतफेड करण्यासाठी मोदी सरकारने कामगार कायद्यात बदल करण्याचा उद्योग चालवित आहे. अच्छे दिन सांगणाऱ्या मोदी सरकारला आम्ही बुरे दिन दाखविल्याशिवाय राहणार नाही. हा आमच्या कामगारा संघनांचा निर्धार असल्याचेही ते म्हणाले. यावेळी वामन बुटले, एच.एस.बेग, राजेश पिंजरकर, संध्या खनके, शोभा बोगावार यांनी मार्गदर्शनात शासन कामगारांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करीत आहे. शासनाने कामगारांना योग्य न्याय द्यावा, अशी मागणीही योळी केली. आभार देवराव लोहकरे यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका, मदतनीस तथा अन्य कामगार सहभागी झाले होते.(नगर प्रतिनिधी)