Corona Virus in NagpuChandrapur; पायाला फोड आल्याने मजुरांना पायी चालता येईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2020 05:34 PM2020-05-02T17:34:36+5:302020-05-02T17:35:08+5:30

संसाराचे गाठोडे पाठीवर आणि चिमुकल्या मुलांना घेऊन आठदहा दिवसापासून त्या मजुरांचा मजलदरमजल जिथे रात्र होईल तिथे मुक्काम करीत शेकडो किमी. आंध्र प्रदेश ते बालाघाट असा खडतर प्रवास पाहणाऱ्या अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणारा आहे.

Workers could not walk due to blisters on their feet | Corona Virus in NagpuChandrapur; पायाला फोड आल्याने मजुरांना पायी चालता येईना

Corona Virus in NagpuChandrapur; पायाला फोड आल्याने मजुरांना पायी चालता येईना

googlenewsNext
ठळक मुद्देपरप्रांतात गेलेल्या मजुरांचा आंध्र प्रदेश ते बालाघाट पायी प्रवास

प्रकाश काळे
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर
संसाराचे गाठोडे पाठीवर आणि चिमुकल्या मुलांना घेऊन आठदहा दिवसापासून त्या मजुरांचा मजलदरमजल जिथे रात्र होईल तिथे मुक्काम करीत शेकडो किमी. आंध्र प्रदेश ते बालाघाट असा खडतर प्रवास पाहणाऱ्या अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणारा आहे.
कोरोना संकटामुळे जग हादरले आहे. कोरोनाची लागण होऊ नये म्हणून राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. लॉकडाऊनला दीड महिन्याचा कालावधी उलटून गेला आहे. कोरोना संसर्गाची लागण टाळण्यासाठी बहुतांश सर्वच कंपन्या बंद करण्यात आल्या आहे.देशात बेरोजगारीचे संकट मोठे आहे. अशातच पोटाचा प्रश्न भागविण्यासाठी मजूर रोजगाराच्या शोधात परप्रांतात गेले होते. सारेकाही व्यवस्थित असताना अचानक आता कोरोनामुळे सर्वच कंपन्या बंद पडल्या आहेत. त्यामुळे रोजगाराच्या शोधात गेलेल्या मजुरांचे कामच कायमचे बंद झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. लॉकडाउनला दीड महिन्याचा कालावधी उलटून गेला, हाताला काम नाही, जवळ होता तोही पैसा खर्च झाल्यामुळे मजुरांजवळ गावाला जायलाही पैसे उरले नाही. लॉकडाऊनमुळे प्रवासी वाहतूक पूर्णत: बंद असल्याने परप्रांतात गेलेल्या मजुरांचा गावी जाण्याचा मार्ग धूसर झाल्याने आंध्रप्रदेश राज्यात अडकलेल्या घरची आस लागलेल्या दहा मजुरांनी पायदळ प्रवास सुरू केला. आंध्रप्रदेश राज्यातून बालाघाट (मध्यप्रदेश)येथे पायदळ निघालेले मजूर आठ_दहा दिवसाच्या खडतर पायी प्रवासानंतर राजुरा तालुक्यातील गोवरी येथे पोहोचले. संसाराचा सारा भार डोक्यावर घेऊन एका चिमुकल्या मुलाला कडेवर घेऊन रडकुंडीला आलेले त्या सर्व मजुरांचे निरागस चेहरे बघणाºया अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणारे होते. गोवरी येथील नागरिक किशोर चिल्लरवार यांनी समाज भावनेतून त्यांना स्वत: नाश्त्याची सोय करून दिली. परप्रांतात गेलेल्या या मजुरांकडील सर्व पैसे खर्च झाल्याने त्यांच्याकडे काही खायलाही पैसे नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. गोवरी येथे १५ मिनिटे थांबून कथन केलेला त्या मजुरांचा शेकडो किमीचा पायी प्रवास अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणारा होता. शेकडो किमीचा पायदळ प्रवास केल्याने मजुरांच्या पायाला फोड आले होते. त्यांना चालताही येत नव्हते. कोरोनामुळे मजुरांच्या नशिबी आलेले भयावह संकट कोणाच्याही वाट्याला येऊ नये, ही उपस्थित गावकऱ्यांनी मनोमन प्रार्थना करीत या मजुरांनी पुन्हा गोवरी मार्गे चंद्रपूर ते बालाघाट असा शेकडो किमीचा पायी प्रवास सुरू केला.

 

Web Title: Workers could not walk due to blisters on their feet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.