भीमशक्ती संघटनेचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले

By Admin | Updated: December 30, 2016 01:26 IST2016-12-30T01:26:07+5:302016-12-30T01:26:07+5:30

भीमशक्ती तथा भीमशक्ती विद्यार्थी संघटना शहर, जिल्हा चंद्रपूरतर्फे गुरुवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर अर्धपुतळा

Workers of Bhimashakti organized the collector's office | भीमशक्ती संघटनेचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले

भीमशक्ती संघटनेचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले

चंद्रपूर : भीमशक्ती तथा भीमशक्ती विद्यार्थी संघटना शहर, जिल्हा चंद्रपूरतर्फे गुरुवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर अर्धपुतळा बाबुपेठ येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्त्व भीमशक्तीचे विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर नागदेवते तसेच भीमशक्ती जिल्हाध्यक्ष एन. डी. पिंपळे यांनी केले.
शिक्षणाचे राष्ट्रीयीकरण करण्यात यावे, शिक्षणाच्या खाजगीकरणामुळे होणारी बंदी थांबवावी, शैक्षणिक दर्जाची समानता निर्माण करण्यात यावी, समान शाळा, समान शिक्षण, समान वातावरणातील शिक्षण देण्यात यावे, खासगी शाळा बंद करून सर्व अनुदानित शाळा सुरू कराव्यात, आदी मागण्या घेवून मोर्चा बाबुपेठ येथून शहराच्या मुख्य मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
त्यानंतर मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. यानंतर शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन दिले. शिष्टमंडळात ज्ञानेश्वर नागदेवते, एन. डी. पिंपळे, कुणाल उराडे, अंकीत मानकर, सुभाष खाडे आदींचा सहभाग होता. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Workers of Bhimashakti organized the collector's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.