कामावरून काढलेल्या कामगाराची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 23:44 IST2018-03-30T23:44:34+5:302018-03-30T23:44:34+5:30
जीएमआर पॉवर प्लॅन्ट या कंपनीत कार्यरत असलेल्या व नंतर त्याला कामावरून कमी केलेल्या कामगाराने गळफास लावून आत्महत्या केली. सदर घटना गुरुवारी रात्री घडली.अक्षय आंबटकर (२३) रा. बाबुपेठ असे सदर कामगाराचे नाव आहे.

कामावरून काढलेल्या कामगाराची आत्महत्या
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : जीएमआर पॉवर प्लॅन्ट या कंपनीत कार्यरत असलेल्या व नंतर त्याला कामावरून कमी केलेल्या कामगाराने गळफास लावून आत्महत्या केली. सदर घटना गुरुवारी रात्री घडली.अक्षय आंबटकर (२३) रा. बाबुपेठ असे सदर कामगाराचे नाव आहे.
न्याय मागण्यासाठी आंदोलन केले, याची शिक्षा म्हणून वरोरा येथीलजीएमआर पॉवर प्लॅन्ट व्यवस्थापनाने तब्बल ८६ कामगारांना कामावरुन काढून टाकले. कंपनीच्या या कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात लढा देणाऱ्या जीआर पॉवर प्लॅन्ट कामगार संघटनेच्या तक्रारीवरुन हे प्रकरण मंत्रालयात पोहचले होते. ८६ कामगारांना एकाच वेळी कामावरुन कमी करुन टाकल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. या विरोधात अनेकदा जिल्हाधिकारी, जिल्हा कामगार आयुक्तांकडे जीएमआर पॉवर प्लांट कामगार संघटनेचे अध्यक्ष दिनेश चोखारे यांच्या नेतृत्वात दाद मागितली. मात्र कुणीही कामगारांच्या तक्रारीची दखल घेतली नाही. यासंबंधीची तक्रार विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्याकडे देण्यात आली आहे. दरम्यान, या कामगारांपैकी अक्षय आंबटकर याने गुरुवारी रात्री गळफास लावून आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच जीएमआर पॉवर प्लांट कामगार संघटनेचे अध्यक्ष दिनेश चोखारे यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. पोलिसांनी याप्रकरणी मर्ग दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.