कामगारांचे काम बंद
By Admin | Updated: June 14, 2017 00:30 IST2017-06-14T00:30:04+5:302017-06-14T00:30:04+5:30
वेकोलि माजरीच्या नागलोन खुल्या कोळसा खाणीत माती काढण्याचे काम करणाऱ्या रंजीत बिल्डकॉन्ड प्रायव्हेट कंपनीने पाच कामगारांना पूर्वसूचनेविना कामावरून बंद केल्यामुळे...

कामगारांचे काम बंद
नागलोन खाण : कामावरून कमी केले
लोकमत न्यूज नेटवर्क
माजरी: वेकोलि माजरीच्या नागलोन खुल्या कोळसा खाणीत माती काढण्याचे काम करणाऱ्या रंजीत बिल्डकॉन्ड प्रायव्हेट कंपनीने पाच कामगारांना पूर्वसूचनेविना कामावरून बंद केल्यामुळे येथील इतर सर्व कामगारांनी कंपनीच्या विरोधात आंदालन पूकारले.
सोमवार दि. १२ जून पासून काम बंद केले आहे. यामुळे रंजीत बिल्डकॉन कंपनीचे व वेकोलिचे उत्पादन ठप्प झाले असून लाखोचा फटका दोन्ही कंपनीला बसला आहे.
कंपनी कामगाराचे शोषण करत असून कुठल्याही प्रकारच्या चुका नसताना कामगारांना मानसिक व आर्थिक त्रास देत असते, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केले आहे. या कंपनीतील तीन पी. सी. आॅपरेटर, तीन वोल्वो आॅपरेटर व एक डोजर आॅपरेटर असे एकूण सात आॅपरेटर सुटी घेवून आपल्या राहत्या गावाला उत्तरप्रदेश बिहार व झारखंडला गेले होते. सुटी संपताच ते आपल्या कामावर परत आले.
परंतु कंपनीने त्यांना कामावर रूजू न करता परत आपापल्या घरी जाण्याचा सल्ला दिला व कामावरून बंद केले, असा आरोप लाल झेंडा कोल माईन्स मजदूर युनियन सिटूचे अध्यक्ष मो नफीस शेख, सचिव महेश आसुटकर, बी. पी. गौतम, महमुद खान यांनी केला आहे.
या संदर्भात कंपनीचे प्रबंधक अर्पित कुमार पटेल म्हणाले, सर्व आरोप खोटे असून फक्त दोघांना नियमित राहात नाही व विना परवानगी रजेवर गेल्यामुळे कामावरून बंद केले आहे. कंपनी कामगाराचा व त्यांच्या हिताचा पूर्ण विचार करत आहे.