मिरची सातऱ्याने मिळाले महिला मजुरांच्या हाताला काम
By Admin | Updated: February 2, 2015 23:03 IST2015-02-02T23:03:12+5:302015-02-02T23:03:12+5:30
विदर्भात अल्पभूधारक शेतकरी शेतमजुरांची संख्या मोठी आहे. शेतीचा हंगाम संपला की, अल्पभूधारक शेतकरी मजुराच्या भूमिकेत दिसतो. महिला मजुरांच्या हाताला काम नसतो.

मिरची सातऱ्याने मिळाले महिला मजुरांच्या हाताला काम
कान्पा: विदर्भात अल्पभूधारक शेतकरी शेतमजुरांची संख्या मोठी आहे. शेतीचा हंगाम संपला की, अल्पभूधारक शेतकरी मजुराच्या भूमिकेत दिसतो. महिला मजुरांच्या हाताला काम नसतो. परंतु, कानपा येथे मिरची कटाईच्या सातऱ्यामुळे परिसरातील शेकडो महिलांना काम मिळाले आहे.
कानपा हे गाव नागपूर-चंद्रपूर मार्गावर असून येथे कोणतेही उद्योग नाही. येथे मिरचीचे तीन सातरे सुरू झाले असून डिसेंबर महिन्यात सुरू झालेल्या या तीन मिरची सातऱ्याने कानपा, बिकली व आजूबाजूच्या गावातील महिला व पुरुष वर्ग येथे कामासाठी येत आहेत. दररोज तिन्ही मिरचीच्या सातऱ्यात मिळून २०० ते २५० मजूर या कामात आहेत. मिरचीच्या देठ काढून त्याला चांगले बनविणे असे येथे काम असते. या सातऱ्यावर वेगवेगळ्या जातीच्या मिरची आणल्या जातात. प्रत्येक महिला मजुरांना बोऱ्याप्रमाणे भाव मिळत असून एक महिला दिवसाला १०० ते १५० रुपये कमावित आहे. यापूर्वी या परिसरातील महिला भुयार येथील मिरचीच्या सातऱ्यावर काम करण्यासाठी जात होते. परंतु कानपा येथेच सातरा सुरु झाल्याने मजुरांचा वेळ व पैसाही बचत होत आहे. बोहरुन आलेल्या मिरचीचे देठ काढून महिलांकडून चांगली मिरची तयार केली जाते. सदर मिरचीच्या सातऱ्यावर डिसेंबर ते मे या सहा महिन्याच्या कालावधीत काम सुरू असतो. या कालावधीत महिलांना शेतीवर काम नसल्याने मिरची कटाईच्या कामाने मजूरीचा प्रश्न मिटला आहे. चांगली मिरची तयार करुन दिल्ली, मुंबई, कलकत्ता यासारख्या मोठ्या शहरात विक्रीसाठी पाठविल्या जात आहे. (वार्ताहर)