कोरोनाचा सामना करण्यासाठी गांर्भीर्याने काम करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 05:00 IST2020-03-24T05:00:00+5:302020-03-24T05:00:58+5:30

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे जिल्हा प्रशासनामार्फत विविध उपाययोजना व खबरदारी घेण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी नविन कोरोना विषाणू आजार प्रतिबंध जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन मा. सा. कन्नमवार सभागृह जिल्हा परिषद चंद्रपूर येथे जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमणार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ते बोलत होते.

Work seriously to fight Corona | कोरोनाचा सामना करण्यासाठी गांर्भीर्याने काम करा

कोरोनाचा सामना करण्यासाठी गांर्भीर्याने काम करा

ठळक मुद्देकुणाल खेमनार : कोरोना विषाणू आजार प्रतिबंध जिल्हास्तरीय कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : आरोग्य विभागावरचा ताण वाढला आहे. तरीही जिल्ह्यातील सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी जबाबदारीने काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केल्या.
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे जिल्हा प्रशासनामार्फत विविध उपाययोजना व खबरदारी घेण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी नविन कोरोना विषाणू आजार प्रतिबंध जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन मा. सा. कन्नमवार सभागृह जिल्हा परिषद चंद्रपूर येथे जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमणार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ते बोलत होते.
या कार्यशाळेला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, कोरोनाचे नोडल वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर मेश्राम, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. संदीप गेडाम, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश साठे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.हेमचंद्र किन्नाके, तसेच सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, विस्तार अधिकारी (आरोग्य), महानगरपालिकेचे वैद्यकीय, जिल्हास्तरीय अधिकारी व पर्यवेक्षक उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांनी सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन करताना, जिल्ह्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ लागू करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वांनी कोरोनासंदर्भात खबरदारी व उपायोजना करणे महत्त्वपूर्ण आहे. तालुकास्तरावर कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृती करणे महत्त्वाचे आहे. तसेच कोणत्याही प्रकारची अफवा येऊ नये, यासाठीदेखील प्रयत्न करावे.
प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कॉरेंटाईन केंद्र स्थापन होणार आहे, असेदेखील यावेळी जिल्हाधिकारी यांनी सांगितले. जिल्ह्याच्या तसेच प्रत्येक तहसील ठिकाणी कोरोना नियंत्रण कक्ष स्थापन केल्याचे त्यांनी सांगितले.

आपत्ती व आमदार निधी उपलब्ध
जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या प्रतिबंधासाठी आपत्ती निधी तसेच आमदार निधीसुद्धा उपलब्ध होणार आहे. ज्या कोरोना संशयित रुग्णांना होम क्वॉरेंटाईन करणार आहे, अशा रुग्णांच्या बोटावर शाई लावण्यात येत आहे. शासकीय सर्व बैठका रद्द केल्या असून फक्त आपत्कालिन बैठका घेण्यात येणार आहे, असे यावेळी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी स्पष्ट केले. कोरोना विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी प्रशासनाच्या निर्देशाचे सर्वांनी पालण करावे, स्वत:ची काळजी घ्यावी, तेव्हाच आपण या आपत्तीला सामोर जाऊ शकू, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

तालुकास्थळी कार्यशाळा घ्या
जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमणार यांनी सर्वच तालुकास्तरावर वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांनी लवकरात लवकर कोरोना प्रतिबंधात्मक कार्यशाळा आयोजित करावी, तसेच त्यासंदर्भातील अहवाल सादर करावा, असे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले.

Web Title: Work seriously to fight Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.