‘लोकमत’च्या उपक्रमाने धन्य झाले

By Admin | Updated: June 28, 2016 01:10 IST2016-06-28T01:10:10+5:302016-06-28T01:10:10+5:30

लोकमत द्वारा आयोजित संस्काराचे मोती २०१५ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील विजेती नेवजाबाई हितकारिणी कन्या विद्यालयाची

The work of Lokmat was blessed | ‘लोकमत’च्या उपक्रमाने धन्य झाले

‘लोकमत’च्या उपक्रमाने धन्य झाले

ब्रह्मपुरी : लोकमत द्वारा आयोजित संस्काराचे मोती २०१५ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील विजेती नेवजाबाई हितकारिणी कन्या विद्यालयाची विद्यार्थिनी संध्या सुधीर राऊत हीने शुक्रवारी नागपूर-दिल्ली व परत दिल्ली-नागपूर असा हवाई सफर केला. या प्रवासानंतर बोलताना ती म्हणाली, ‘लोकमत’च्या या उपक्रमाने मी धन्य झाली म्हणत, आनंदाने भारावून गेली.
मनोगत व्यक्त करताना ती म्हणाली, २४ जून शुक्रवारला लोकमत समूहाच्या वतीने मला नागपूर-दिल्ली व परत दिल्ली-नागपूर असा हवाई सफरचा मान मिळाला. दिल्लीला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग व रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याशी भेट झाली. या प्रसंगाने मला देशाची लोकसभा पाहायला मिळाली. हे माझे भाग्य ‘लोकमत’ने साकार केल्याने लोकमतचे अनंत आभार आहेत. या प्रवासात इंदिरा गांधी म्युझीयम, इंडिया गेट व अन्य स्थळे मनभरुन पाहायला मिळाली. तसेच दिल्लीच्या लोकमत समूहाचे चिफ विजयबाबू दर्डा यांच्या निवासस्थानी भोजनाचाही आस्वाद घेतला. तो क्षण महत्त्वपूर्ण होता. एकूणच विमानाचा प्रवास, जेवणाची सोय, दिल्लीला फिरावयास नेण्यात येणारी व्यवस्था, हे सर्व उत्कृष्ठ होते. हवाई सफरचा तो दिवस माझ्यासाठी सोन्याचा होता, अशी प्रतिक्रिया संध्याने ‘लोकमत’समोर व्यक्त केली. (तालुका प्रतिनिधी)

हवाई सफरचा मान शाळेच्या विद्यार्थिनीला मिळाल्याने ‘लोकमत’चे आभार. संस्था सचिव अशोक भैय्या व मुख्याध्यापिका प्रभा मैद यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे नाव या उपक्रमामुळे मोठे झाले आहे.
-राजू हटवार, शिक्षक,

संध्याला ही संधी प्राप्त झाल्याने आनंद झाला. वर्ग मैत्रीणीला हा मान मिळाल्याने आमच्यात आत्मविश्वास निर्माण झाला आहे.
-देवयानी ठाकरे, वर्ग मैत्रीण.

Web Title: The work of Lokmat was blessed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.