लोकमान्य व लोकशाहीरांचे कार्य सदैव प्रेरणादायी -अहीर
By Admin | Updated: August 3, 2016 01:56 IST2016-08-03T01:56:44+5:302016-08-03T01:56:44+5:30
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील थोर पुढारी भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी आपल्या वाणी

लोकमान्य व लोकशाहीरांचे कार्य सदैव प्रेरणादायी -अहीर
चंद्रपूर : भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील थोर पुढारी भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी आपल्या वाणी आणि लेखणीतून भारतीय जन मानसात ब्रिटीशाविरुद्ध असंतोष प्रदिप्त करण्याचे महान कार्य करून देशाच्या स्वातंत्र्यात भरीव योगदान दिले. त्यांच्या प्रखर राष्ट्रभिमानी वृत्ती व कृतीतून प्रेरणा घेवून असंख्यांनी स्वातंत्र्याचा लढा प्रखरपणे लढला. अशा महान स्वातंत्र्य योद्ध्याचे स्मरण करतानाच त्यांनी भारतीय जनतेला दाखविलेल्या राष्ट्रवादी विचाराचा वारसा जतन करून त्यांनी दाखविलेल्या मार्गाने वाटचाल करावी व स्वातंत्र्य भारताच्या विकासात योगदान देत देशाची महाशक्तीच्या दिशेने वाटचाल होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.
१ आॅगस्ट रोजी स्थानिक कस्तुरबा चौकातील भाजपा जनसंपर्क कार्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी कार्यक्रम प्रसंगी लोकमान्य टिळक यांना श्रद्धांजली अर्पण करताना ते बोलत होते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस ना. अहीर यांनी माल्यार्पण करून त्यांच्या असामान्य कार्याचे याप्रसंगी स्मरण केले.
कार्यक्रमास भाजपा महाराष्ट्र प्रदेशचे कार्यकारिणी सदस्य विजय राऊत, मनपा गटनेते अनिल फुलझेले, जिल्हा सचिव राहूल सराफ, भाजयुमोचे महानगर उपाध्यक्ष मोहन चौधरी, राजू येले, राजू घरोटे, विकास खटी, राजेंद्र कागदेलवार, केशव लांजेवार, अशोक सोनी, खनके आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)