घोसरी फाटा ते जुनगाव डांबरीकरण मार्गाचे काम रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:28 IST2021-04-02T04:28:49+5:302021-04-02T04:28:49+5:30
काही दिवसांपूर्वी कंत्राटदाराने सदर रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू करून अर्ध्या एक किलोमीटर अंतरावरचे कामसुद्धा आटोपले होते. थातूरमातूर काम झाल्याने ...

घोसरी फाटा ते जुनगाव डांबरीकरण मार्गाचे काम रखडले
काही दिवसांपूर्वी कंत्राटदाराने सदर रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू करून अर्ध्या एक किलोमीटर अंतरावरचे कामसुद्धा आटोपले होते. थातूरमातूर काम झाल्याने मार्गावरील काही भागाचे डांबरीकरण रखडले आहे. त्यामुळे रस्त्याची दुर्दशा होऊन दुचाकी, चारचाकी वाहनधारकांना याचा फटका बसत आहे. रस्त्याची पुन्हा गिट्टी निघून रस्ता पोखरला जात असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. मागील तीन वर्षांपासून काम सुरू झाल्याचे कळते. परंतु संबंधित रस्त्याचे डांबरीकरण आतापर्यंतसुद्धा परिपूर्ण झाले नसल्याने जनतेकडून रोष व्यक्त केला जात आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप जनतेकडून केला जात आहे. तेव्हा जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष केंद्रित करून सदर मार्गाचे त्वरित डांबरीकरण पूर्ण करून रस्त्याचे काम करावे, अशी मागणी होत आहे.