२५ पासून मनपा कंत्राटी कामगार संपावर
By Admin | Updated: March 22, 2017 00:54 IST2017-03-22T00:54:32+5:302017-03-22T00:54:32+5:30
किमान वेतन देण्याच्या प्रमुख मागणीसह विविध मागण्याच्या पुर्ततेसाठी मनपामधील सफाई विभाग, वैद्यकीय विभाग, पाणी विभागमधील ...

२५ पासून मनपा कंत्राटी कामगार संपावर
विदर्भ प्रहार संघटनेचे नेतृत्व : किमान वेतन देण्याची मागणी
चंद्रपूर : किमान वेतन देण्याच्या प्रमुख मागणीसह विविध मागण्याच्या पुर्ततेसाठी मनपामधील सफाई विभाग, वैद्यकीय विभाग, पाणी विभागमधील सर्व कंत्राटी कामगार विदर्भ प्रहार संघटनेच्या नेतृत्वामध्ये २५ मार्चपासून संपावर जाणार आहेत.
स्थानिक चांदा क्लब ग्राऊंडवर विदर्भ प्रहार संघटनेच्या नेतृत्वाखाली चंद्रपूर मनपामध्ये कार्यरत सफाई विभाग, वैद्यकीय विभाग, पाणी विभागमधील सर्व कंत्राटी कामगारांची विदर्भ प्रहार संघटेनच्या अध्यक्ष हर्षल चिपळूणकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा भरली यावेळी संपावर जाण्याचा निर्णय मनपामधील कंत्राटी कामगारांनी घेतला.
मागील काही महिन्यापूर्वी मनपा आयुक्तानी कंत्राटी कामगारांना किमान वेतन देण्यात यावे, अशा सुचना देण्यात आल्या. मात्र अजुनही मनपामधील कंत्राटी कामगारांना किमान वेतन देण्यात आले नाही. तसेच वेतनसुद्धा थकीत आहे.
त्यामुळे २५ मार्चच्या आत मागण्या पूर्ण करण्यात याव्या, अन्यथा मनपा निवडणुकीत बहीष्कार टाकण्याचा व संपावर जाण्याचा ईशारा मनपातील सफाई विभाग, वैद्यकीय विभाग, पाणी विभागमधील सर्व कंत्राटी कामगारांनी दिला आहे. (नगर प्रतिनिधी)
या आहेत मागण्या
किमान वेतन देण्यात यावे, १९ जानेवारीला मनपा आयुक्तांनी काढलेल्या आदेशाचे पालण करण्यात यावे, पी. एफ. व ई. एस.आयची अमंलबजावणी करण्यात यावी, प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रम फेज-२ अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना मनपा अस्थापनेत सामावून घेण्यात यावे, थकित वेतन देण्यात यावे.