मंजूर झालेल्या घरकुलांची कामे रेतीअभावी रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:39 IST2020-12-14T04:39:55+5:302020-12-14T04:39:55+5:30
रेती घाटाचा लिलाव जिल्हा प्रशासनाने केला नसल्याने रेती मिळविणे मोठी तारेवरची कसरत झाली आहे. याचाच फायदा घेत रेती घाटातून ...

मंजूर झालेल्या घरकुलांची कामे रेतीअभावी रखडली
रेती घाटाचा लिलाव जिल्हा प्रशासनाने केला नसल्याने रेती मिळविणे मोठी तारेवरची कसरत झाली आहे. याचाच फायदा घेत रेती घाटातून चोरटया मार्गाने रेतीची तस्करी करणाºयांचे चांगलेच फावत आहे. महसूल विभाग, पोलीस विभाग व वन विभागाच्या डोळ्यात धूळ फेकून मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी केल्या जात आहे. ही रेती प्रति ट्रॅक्टर पाच हजार रुपये याप्रमाणे सर्रास विकल्या जात आहे. याबाबत काही अधिकाºयांना माहिती आहे. मात्र यात त्यांचेही हात ओले झाल्याने ते मूग गिळून आहेत.
रेती तस्करांचे मनसुबे मात्र बुलंद दिसत असून आष्टा, पारोधी, अजूर्नी घाटातील रेतीचे मोठ्या प्रमाणात खनन केले जात आहे. यामुळे रेती तस्कर अल्पावधीतच गब्बर बनले आहेत. मात्र पर्यावरणाची मोठी हानी होत आहे.
गोरगरिबांची मंजूर झालेलीे घरकुलाची कामे रेतीअभावी रखडली असल्याने जिल्हाधिकारी यांनी स्वत: लक्ष घालून रेती घाटांचा लिलाव करावा, अशी मागणी आहे.