बिबी येथे बचत गटांचा महिला आनंद महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:24 IST2021-01-17T04:24:27+5:302021-01-17T04:24:27+5:30

कोरपना : सावित्रीबाई फुले जयंती व मकरसंक्रांतीच्या निमित्ताने बिबी येथे बचत गट महिलांचा महिला आनंदोत्सव-२०२१ महोत्सव जल्लोषात पार पडला. ...

Women's Happiness Festival of self-help groups at Bibi | बिबी येथे बचत गटांचा महिला आनंद महोत्सव

बिबी येथे बचत गटांचा महिला आनंद महोत्सव

कोरपना : सावित्रीबाई फुले जयंती व मकरसंक्रांतीच्या निमित्ताने बिबी येथे बचत गट महिलांचा महिला आनंदोत्सव-२०२१ महोत्सव जल्लोषात पार पडला. सावित्रीबाई फुले महिला बचत गटाच्या महिलांनी पुढाकार घेत बचत गटांना मार्गदर्शन व विविध स्पर्धांतून कलागुणांना वाव देत व्यासपीठ मिळवून दिले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पं. स. सदस्य सविता काळे तर अतिथी म्हणून गटाच्या अध्यक्ष सुनीता पावडे, सचिव सखू खोके, निर्मला गिरटकर, कुंदा चटप, अल्का पिंगे, लता आस्वले, सुनीता अंदनकर, चंद्रकला क्षीरसागर, माया घुगूल, इंदू काळे, मीरा बोबडे उपस्थित होते. यावेळी कृषी सहायक रेणुका उदगिरे, उमेदच्या तालुका व्यवस्थापक अर्चना बोनसुले यांनी बचत गटाच्या महिलांना सक्षमीकरणासाठी लघुउद्योगाबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या संयोजिका स्नेहल संतोष उपरे यांनी महिलांच्या कलागुणांना वाव मिळणे व बचत गट सक्षम होऊन आगामी काळात लघुउद्योग सुरू होणे गरजेचे आहे, त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची भूमिका मांडली.

महिला आनंदोत्सवात सामूहिक हळदी-कुंकू कार्यक्रम पार पडला. महिलांच्या आनंदासाठी उखाणे स्पर्धा घेण्यात आली. यात प्रथम सुलोचना लालसरे, द्वितीय कमला ढवस, तृतीय माया अहिरकर, फॅशन शो स्पर्धेत प्रथम आकांक्षा टोंगे, द्वितीय रोशनी आस्वले, तृतीय प्रीती घुगूल, समूह नृत्य स्पर्धेत वूमेन इम्पाॅवरमेंट ग्रुपच्या श्वेता आस्वले, अश्विनी सोनुले, योगिनी आडकिने, हर्षाली आडकिने, धनश्री भोयर यांनी प्रथम तर द्वितीय पारितोषिक सेवार्थ ग्रुपच्या प्रीती घुगूल, वंदना मुसळे, जयश्री पावडे, नेहा चौके यांनी व तृतीय पारितोषिक दुर्गा ग्रुपच्या उषा उपरे, प्रिया आत्राम, सुनीता सूर्यगंध, पल्लवी सातघरे यांनी पटकावले. प्रोत्साहन पारितोषिक कविता कुमरे, सविता मडावी, मालती मेश्राम, सुगंधा मेश्राम, स्वाती मट्टे, पौर्णिमा उइके, सुमन भगत, उषा पानघाटे, शारदा मोहजे, छाया सोनटक्के, सुनंदा मरस्कोल्हे, जोगवा ग्रुपच्या सुवर्णा विरुटकर, सोनू विरुटकर, दीपाली मेश्राम, पूजा घुगूल, स्मिता आवळे यांना देण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण अरुणा बुचे, मीरा उजळे, अरुणा चव्हाण यांनी केले. संचालन साक्षी पाचभाई, केशरी गिरटकर, तेजस्विनी बुचे तर आभार चंद्रकला क्षीरसागर, निर्मला गिरटकर यांनी मानले.

••••••••

महोत्सवाने बचत गट महिला एकवटल्या

गावात पहिल्यांदाच बचत गट महिलांचा आनंद महोत्सव सावित्रीबाई फुले महिला बचत गटाने घेतला. यात साधारणत: गावातील पाचशे ते आठशे महिलांची उपस्थिती होती. बचत गट सक्षमीकरणासाठी या आनंद महोत्सवात सविस्तर चर्चा झाली. लघुउद्योग उभारून आर्थिक समृद्धी साधण्याचे बचत गट महिलांनी ठरवले. गावात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात गावातील बचत गटाच्या महिला एकत्र येत कलागुणांचा आविष्कार घडवला, हे विशेष.

Web Title: Women's Happiness Festival of self-help groups at Bibi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.