अवैध दारूविक्री विरोधात महिलांचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:20 IST2021-04-29T04:20:24+5:302021-04-29T04:20:24+5:30

गावातील अवैध दारू विक्री हद्दपार करण्यासाठी येथील ग्रामपंचायत प्रशासनाने सुरुवातीच्या काळात चंग बांधला होता. काहींची दारू पकडून महिला व ...

Women's Elgar against illegal sale of alcohol | अवैध दारूविक्री विरोधात महिलांचा एल्गार

अवैध दारूविक्री विरोधात महिलांचा एल्गार

गावातील अवैध दारू विक्री हद्दपार करण्यासाठी येथील ग्रामपंचायत प्रशासनाने सुरुवातीच्या काळात चंग बांधला होता. काहींची दारू पकडून महिला व युवकांनी पोलिसांच्या स्वाधीन करून वचक बसविला होता. तरीही दारू विक्रेत्यांनी याला न जुमानता गावात दारू विक्रीचा गोरखधंदा सुरूच ठेवला. दरम्यान, गावातील महिला व युवकांनी पुन्हा दारू विक्रेत्यांवर पाळत ठेवत तीन दारू विक्रेत्यांना रंगेहाथ पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. दामोदर देविदास चुदरी, मुकरू मारोती झंझाड, आषिश उर्फ ढिवरू झंझाड अशी आरोपींची नावे असून पोलिसांनी त्यांच्याकडून मोहफुल, गूळंबा व दारू जप्त केली आहे. ही कारवाई मुलचे ठाणेदार राजपूत यांच्या मार्गदर्शनात बेंबाळ पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत ठवरे, आनंद तितीरमारे, पुंडलिक परचाके, गायकवाड व गावातील महिलांनी केली.

Web Title: Women's Elgar against illegal sale of alcohol