नागभीड पं.स.मध्ये महिला दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:31 IST2021-03-09T04:31:40+5:302021-03-09T04:31:40+5:30

नागभीड : तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष व पंचायत समिती नागभीड यांच्या विद्यमाने महिला दिनानिमित्त महिला मेळावा घेण्यात आला. या ...

Women's Day in Nagbhid PNS | नागभीड पं.स.मध्ये महिला दिन

नागभीड पं.स.मध्ये महिला दिन

नागभीड : तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष व पंचायत समिती नागभीड यांच्या विद्यमाने महिला दिनानिमित्त महिला मेळावा घेण्यात आला.

या महिला मेळाव्यात तालुक्यातील महिलांनी उपस्थिती दर्शविली होती.

मेळाव्याचे उद्घाटन उपसभापती रागिणी गुरुपुडे यांनी केले. अध्यक्षस्थानी सभापती प्रफुल्ल खापर्डे होते. प्रमुख आतिथी म्हणून जि.प. सदस्य खोजराम मरस्कोल्हे, जि.प. सदस्य संजय गजपुरे, गटविकास अधिकारी प्रणाली खोचरे, बालविकास प्रकल्प अधिकारी राजेंद्र ठोंबरे यांची उपस्थिती होती.

या महिला मेळाव्यात महिला दिनाचे औचित्य साधून ग्रामीण भागात सन २०१९-२१ या कालावधीत उत्कृष्टरीत्या काम केलेल्या विविध सखींचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक तालुका अभियान व्यवस्थापक मोहित नैताम यांनी केले. संचालन ज्योती साळवे यांनी केले.

Web Title: Women's Day in Nagbhid PNS