शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

कोरोनाने कुंकू पुसलेल्या महिलांना मिळाला आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2021 5:00 AM

कोरोनामुळे पतीचे अकाली निधन झाल्यामुळे अशा महिलांवर आभाळ कोसळले आहे. अनेकींच्या वाट्याला हालअपेष्टा आल्या आहेत. विविध समस्यांचा सामना करीत त्या जीवन जगत आहेत. यातील  प्रत्येकींचीच आर्थिक परिस्थिती चांगली नाही. त्यामुळे  अडचणींचा सामना  करावा लागत आहे. या महिलांना आधार मिळावा यासाठी शासनाने विविध योजनांच्या माध्यमातून मानधन देणे सुरू केले आहे. शासकीय निकषांमध्ये बसत असलेल्या विधवा महिलांना हा लाभ दिला जात आहे.

साईनाथ कुचनकार लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना संकटामुळे विधवा झालेल्या महिलांना आर्थिक ताण पडू नये, त्यांचे जगणे सुसह्य व्हावे यासाठी संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभ दिला जात आहे. याअंतर्गत आजपर्यंत जिल्ह्यात २०५ महिलांना लाभ  मिळाला आहे. अन्य महिलांचेही प्रस्ताव दाखल झाले असून तालुकास्तरीय समिती यावर निर्णय घेणार आहे. लाभ मिळत असल्यामुळे काही प्रमाणात का होईना, पडत्या काळात  दिलासा मिळाला आहे.कोरोनामुळे पतीचे अकाली निधन झाल्यामुळे अशा महिलांवर आभाळ कोसळले आहे. अनेकींच्या वाट्याला हालअपेष्टा आल्या आहेत. विविध समस्यांचा सामना करीत त्या जीवन जगत आहेत. यातील  प्रत्येकींचीच आर्थिक परिस्थिती चांगली नाही. त्यामुळे  अडचणींचा सामना  करावा लागत आहे. या महिलांना आधार मिळावा यासाठी शासनाने विविध योजनांच्या माध्यमातून मानधन देणे सुरू केले आहे. शासकीय निकषांमध्ये बसत असलेल्या विधवा महिलांना हा लाभ दिला जात आहे. त्यामुळे कठीण काळामध्ये या शासकीय आधारामुळे थोडाफार दिलासा मिळत आहे. विशेष म्हणजे, २०५ महिलांना आधार मिळाला असला तरी, अन्य महिलांनाही लाभ मिळावा यासाठी  कागदपत्रे गोळा करण्याचे काम सुरू करण्यात आले असून त्याही महिलांना लाभ मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. 

२० हजारांचे अर्थसहाय्य

राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजनेतून अल्पगटातील विधवा महिलांना एकदाच २० हजार रुपयांचे अर्थसाहाय्य दिले जाते. यासाठी संबंधित महिलांना पतीच्या निधनानंतर तीन वर्षाच्या आत प्रशासनाकडे अर्ज सादर करावा लागतो.

येथे करा अर्ज...अर्जदाराने शासन निर्णयानुसार आर्थिक साहाय्य मिळविण्यासाठी निर्धारित केलेला अर्ज भरावा. ज्या ठिकाणी राहत असेल, त्या भागातील संबंधित तलाठ्याकडे अर्ज सादर करावा.

विधवा तसेच निराधार असलेल्या महिलांना शासनाच्या विविध योजना आहेत. या योजनांच्या माध्यमातून त्यांना लाभ दिला जातो. महिलांनी संबंधित तहसील कार्यालयामध्ये अर्ज सादर करावा. समितीने अर्ज मान्य केल्यानंतर दर महिन्याला संबंधित महिलांना मानधन दिले जाते.- डाॅ. कांचन जगतापतहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या