महिलांनी घेतला कुपोषणमुक्तीचा ध्यास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 00:22 IST2017-11-25T00:22:06+5:302017-11-25T00:22:31+5:30
तालुक्यातील चिनोरा ग्रामपंचायत अंतर्गत येणाºया हुडकी येथे कुपोषणाचे प्रमाण वाढत आहे.

महिलांनी घेतला कुपोषणमुक्तीचा ध्यास
आॅनलाईन लोकमत
वरोरा : तालुक्यातील चिनोरा ग्रामपंचायत अंतर्गत येणाºया हुडकी येथे कुपोषणाचे प्रमाण वाढत आहे. ही बाब हेरुन येथील सरपंच सुशीला तेलमोरे यांनी गाव कुपोषणमुक्त करण्याचा ध्यास घेतला आहे. त्याअनुषंगाने गावातील काही महिलांची समिती स्थापन करून कुपोषणमुक्तीसाठी विशेष प्रयत्न सुरु केले असून आतापर्यंत सहा बालकांना कुपोषणमुक्त करण्यात त्यांना यश आले आहे.
शासनाने कुपोषण मुक्ती करण्यासाठी विशेष योजना राबविण्यात येत आहेत. मात्र त्याबाबत योग्य त्या प्रमाणात जनजागृती होत नसल्यामुळे ग्रामीण भागात कुपोषणाचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढत आहे. वरोरा तालुक्यातील चिनोरा ग्रामपंचायत अंतर्गत हुडकी येथील आंगनवाड़ी केंद्रातील कुपोषणाचे प्रमाण बघून सरपंच सुशीला तेलमोरे यांनी कुपोषण समूळ नष्ट करण्याच्या हेतूने येथील महिलांच्या आधारे एका समितीची स्थापना केली. या समितीच्या अध्यक्षपदी सरपंच सुशिला तेलमोरे, तर सदस्य म्हणून पं.स.सदस्य संजीवनी भोयर, अंगणवाडी सेविका रंजना गेडाम, शीतल पारेकर, वाळके, म्हैसमार, रेखा आसुटकर, अनिता ढवस, मंगला शेटे, सरला मालेकर, मनीषा सावसागडे, अर्चना वाटकर, बावणे आदींचा समावेश आहे. या महिलांच्या समितीच्या आधारे विशेष उपक्रम राबविणयात येतात. त्यामध्ये या समितीकडून दर आठवड्यात बालकांना ड्रायफुट, पोषक आहार देण्यात येतो. दर आठवड्यात बालकांचे वजन तपासले जाते. यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेतला जातो. या उपक्रामतून या पथकाने परिसरातील सहा बालकांना कुपोषण मुक्त करण्यात यश आले आहे. विशेष म्हणजे या मोहिमेत या महिलांना शासनाची कोणत्याही योजनेचा लाभ घेतला नाही.