महिलांनी लघु उद्योग सुरू करावे

By Admin | Updated: May 28, 2017 00:46 IST2017-05-28T00:46:48+5:302017-05-28T00:46:48+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री उज्जवला गॅस योजनेअंतर्गत स्वयंसहायता बचत गटातील महिलांना गॅस मोफ त उपलब्ध करून दिला आहे.

Women start small enterprises | महिलांनी लघु उद्योग सुरू करावे

महिलांनी लघु उद्योग सुरू करावे

संजय धोटे यांचे आवाहन : महिला सन्मान कार्यक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री उज्जवला गॅस योजनेअंतर्गत स्वयंसहायता बचत गटातील महिलांना गॅस मोफ त उपलब्ध करून दिला आहे. केंद्र सरकार विविध प्रकारच्या योजना महिलांकरिता राबविण्यात येत आहेत. मुद्रा योजनेच्या माध्यमातून महिलांनी लाभ घेऊन लघु उद्योग सुरू करावे. त्यासाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेद्वारे आयोजित विविध कौशल्य विकास प्रशिक्षण घ्यावे, असे आवाहन आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांनी केले.
राजुरा येथील सुपर मार्केट हॉल येथे बिरसा मुंडा इण्डेण गँस एजंन्सी यांचे सौजन्याने महिलांचा सन्मान पंतप्रधान उज्ज्वला मोफत गॅस बी.पी.एल व अनुदान सोडलेले प्रमाणपत्र वितरण सोहळा, सेप्टी क्लिनिक मार्गदर्शन, पाणी व पीक व्यवस्थापन मार्गदर्शन कार्यक्रम आयोजन करण्यात आले. या मार्गदर्शन मेळाव्यात आमदार धोटे बोलत होते.
यावेळी प्रमुख पाहुणे जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचे खुशाल बोंडे, गोंडपिपरी प.स. सभापती दीपक सातपुते, राजुराचे नगसेवक राध्येश्याम अडानिया, उज्जवला जयपूलकर, प्रिती ेकलवार, प.स.सदस्या सुंनदा डोगे, नैना परचाके, संजय गाधी निराधार योजनेचे अध्यक्ष सतीश धोटे, इंडियन गॅस एजंसीचे संचालक वाघूृ गेडाम, , यांच्यासह ई.पी.सी कंपनीचे मुख्य व्यवस्थापक पी.सी. कातकर, महाप्रबंधक गुल्हाणे, प्रबंधक सीताराम वर्मा आदी उपस्थित होते.
संचालक मंडळाच्या वतीने मान्यवर पाहुण्यांचा सत्कार आला. महिलांनी मुद्रा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.

Web Title: Women start small enterprises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.