महिलांनी स्वयंभू विचारातून विकास साधावा

By Admin | Updated: October 18, 2015 01:04 IST2015-10-18T01:04:12+5:302015-10-18T01:04:12+5:30

२१व्या शतकातील सर्वच क्षेत्रातील आव्हानांचा स्वीकार करण्याकरिता महिलांनी सज्ज व्हावे.

Women should develop development through self-respect | महिलांनी स्वयंभू विचारातून विकास साधावा

महिलांनी स्वयंभू विचारातून विकास साधावा

जोरगेवार : महिला विकास कार्यक्रम
चंद्रपूर: २१व्या शतकातील सर्वच क्षेत्रातील आव्हानांचा स्वीकार करण्याकरिता महिलांनी सज्ज व्हावे. समाजातील तळागळातील प्रश्नांची सोडवणूक करण्याकरिता महिलांचा सहभाग महत्त्वाचा ठरला आहे. त्याचप्रमाणे महिलांनी आपल्या समस्या सोडविण्याकरिता संघटनात्मक शक्तीचा प्रभावी वापर केला आहे. मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण आज वाढलेले असून कर्तृत्वाची यशोशिखरे ती जिंकत आहे. तेव्हा महिलांनी आपल्या स्वयंभू विचारांचा उपयोग करुन संघटितपणातून विकास साधावा, असे आवाहन शिवसेना नेते किशोर जोरगेवार यांनी केले.
युनिसेफ तथा जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक ग्रामपंचायत पिपरी येथे आयोजित दीपशिखा किशोरी महिला विकास कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी किशोर जोरगेवार बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर माजी जिल्हा प्रमुख दीपक दापके, शिवसेना महिला जिल्हा प्रमुख भारती दुधानी, उपजिल्हा प्रमुख माया पटले, सरपंच पारस पिंपळकर, अरुण तुराणकर, महिला शहर प्रमुख सायली येरणे, युनिसेफचे दिलीप देवतळे, वर्षा रामटेके, किरण अलोणे, चंदू माथने, गणेश आवारी, प्रवीण खनके, विश्वजीत शहा, नितीन नागरीकर, विलास वनकर, विनोद गोल्लजवार, विलास सोमलवार, मुन्ना जेगी आदींची उपस्थिती होती.
तत्पूर्वी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण तसेच दीप प्रज्वलित करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. चिमुकल्यांच्या स्वागतगीताने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. प्रास्ताविक कार्यक्रमाच्या संयोजिका शीतल उईके यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता लीला नगराळे, रसिका मांडवकर, छाया ताठे यांनी परिश्रम घेतले. (शहर प्रतिनिधी)
वनविभागाचे कार्यालय जीर्णावस्थेत
कान्हाळगाव : कोरपना तालुक्यातील वनसडी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या पारडी येथील वनविभाग कार्यालयाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी नवीन इमारत व परिसरात संरक्षण भिंत बांधण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Women should develop development through self-respect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.