आरक्षणाच्या लाभातून महिलांंनी सक्षम व्हावे
By Admin | Updated: January 19, 2016 00:43 IST2016-01-19T00:43:45+5:302016-01-19T00:43:45+5:30
संविधानाने महिलांना सक्षम होण्याची संधी दिली आहे. महिलांना पुरूषांच्या बरोबरीचे स्थान समाजात मिळावे ...

आरक्षणाच्या लाभातून महिलांंनी सक्षम व्हावे
नंदा पराते : माना समाज मंडळाचा पारिवारिक मेळावा
चंद्रपूर : संविधानाने महिलांना सक्षम होण्याची संधी दिली आहे. महिलांना पुरूषांच्या बरोबरीचे स्थान समाजात मिळावे यासाठी सरकारने आरक्षणही दिले आहे. या आरक्षणाचा लाभ घ्या आणि सक्षम व्हा, असे आवाहन आदीम पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष नंदा पराते यांनी केले.
स्थानिक इंदीरा नगर परिसरात रविवारी माना समाजाचा स्रेहमिलन कौटुंबिक मेळावा पार पडला. त्यावेळी प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या. मेळाव्याचे उद्घाटन देवीदास जांभुळे यांनी केले. अध्यक्षस्थानी माजी सभापती आकडूजी नन्नावरे होते. अ.भा. अनिसचे राज्य संघटक दिलीप सोळंकी, प्रा. दिलीप चौधरी आणि मंडळाचे अध्यक्ष विठ्ठल ढोक यावेळी प्रमुख पाहुणे होते. यावेळी बोलताना पराते पुढे म्हणाल्या, माना समाजाच्या जाती प्रमाणपत्राचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. सरकारने या समाजातील युवकांच्या अडचणी ओळखून त्यावर मार्ग काढावा. आदिवासींच्या विकासासाठी स्वतंत्र विदर्भ हा योग्य पर्याय आहे. स्वतंत्र राज्यातून आदिवासींचे प्रश्न सुटू शकतात, त्यामुळे या लढ्यात आदिवासींनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी अन्य पाहुण्यांचीही भाषणे झाली. संचालन सुभाष नन्नावरे यांनी केले. कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती लक्षणिय होती. (जिल्हा प्रतिनिधी)