आर्थिक विकासात महिलांची भूमिका महत्त्वाची
By Admin | Updated: June 29, 2015 01:42 IST2015-06-29T01:42:57+5:302015-06-29T01:42:57+5:30
वाढते प्रदूषण, पर्यावरणाची समस्या, आरोग्याचा प्रश्न व दूषित वातावरणाला हातभार लावण्याचे काम टाकावू वस्तू करीत असतात.

आर्थिक विकासात महिलांची भूमिका महत्त्वाची
टाकावू वस्तुवर कार्यशाळा : हरीश गेडाम यांचे प्रतिपादन
बल्लारपूर: वाढते प्रदूषण, पर्यावरणाची समस्या, आरोग्याचा प्रश्न व दूषित वातावरणाला हातभार लावण्याचे काम टाकावू वस्तू करीत असतात. अशा वस्तूंपासून टिकावू वस्तू तयार करुन आर्थिक उन्नतीचा मार्ग महिला दाखवू शकतात. त्याची भूमिका महत्वाची ठरते, असे प्रतिपादन बल्लारपूर पंचायत समितीचे माजी सभापती अॅड. हरिश गेडाम यांनी शनिवारी येथील कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी केले.
येथील लोकसमग्र सामाजिक संस्थेच्यावतीने बचत गटातील महिला, आशा सेविका व सामाजिक क्षेत्रात कार्य करण्याऱ्यांठी टाकावू वस्तूवर कार्यशाळा शनिवारी संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली, त्यावेळी अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.
कार्यशाळेचे उद्घाटन बल्लारपूर पंचायत समितीचे उपसभापती अनेकश्वर मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे संचालक जोबीन आव्हेलील, मार्गदर्शक अर्जून अलगमकर, सुजाता नगराळे, नितून गोडशेलवार, भास्कर ठाकूर, संदीप नळे यांची उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना अनेकश्वर मेश्राम म्हणाले, सामाजिक संस्था विकासाला चालना देणारे उपक्रम राबविते. सामाजिक परिवर्तनाचे कार्य करते. सदर कार्यशाळा आपल्या जीवनाच्या उत्कर्षात भर टाकणारी असून नव्या संधीची दिशा देणारी असल्याचे त्यांनी सांगितले. यातून माणूस घडविण्याचे काम होणार असल्याचे ते म्हणाले.
प्रास्ताविक भास्कर ठाकूर यांनी केले. संचालन संदीप नळे यांनी तर वर्षा दानव यांनी आभार मानले. यावेळी बचतगटाच्या कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)