महिलांनी केला दारूमुक्तीचा निर्धार

By Admin | Updated: January 31, 2015 01:09 IST2015-01-31T01:09:25+5:302015-01-31T01:09:25+5:30

महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनी श्रमिक एल्गारच्या कार्यकर्त्यांनी दारूबंदी करणारे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व महाराष्ट्र शासनाचे आभार ...

Women made the determination of emancipation | महिलांनी केला दारूमुक्तीचा निर्धार

महिलांनी केला दारूमुक्तीचा निर्धार

सावली : महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनी श्रमिक एल्गारच्या कार्यकर्त्यांनी दारूबंदी करणारे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व महाराष्ट्र शासनाचे आभार मानत दारूबंदीनंतर दारूमुक्तीसाठी शपथ घेत दारूमुक्तीचा निर्धार केला.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज दारूमुक्ती अभियानांतर्गत गत ५ वर्षापासून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीची मागणी लावून धरली. दारूबंदी अभियानाची सुरवात करतांना मोझरी येथील तुकडोजी महाराज यांच्या समाधीसमोर महिलांनी दारूबंदीची शपथ घेतली होती. त्यानंतर महिलांचे अनेक लढे झालीत. चिमुर ते नागपूर पदयात्रा, जेल सत्याग्रह, मुंडन आंदोलन करून सरकारचे आंदोलनाकडे लक्ष वेधण्यात आले.
निवडणुकीच्या काळात दारूबंदीचे आश्वासन देणारे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना निवडून आणण्यासाठी चंग बांधला. या महिलांच्या लढ्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने २० जानेवारीला चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीची घोषणा केली. दारूबंदी झाल्यानंतर अवैध दारूविक्री वाढेल, दारूड्यांची संख्या वाढणार अशी शंका व्यक्त केल्या जात आहे. मात्र, दारू मुक्तीसाठीही आम्ही सज्ज आहोत, हे हजारो महीलांच्या संख्येने दिसून आले.
सावली येथील ज्योतीबा फुले चौक ते खादी भंडार कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली. गांधीजींचे वास्तव्य असलेल्या ठिकाणी सभा घेण्यात आली. सभेचे अध्यक्ष गांधीवादी जेष्ठ सामाजीक कार्यकर्त्या लिलाताई चितळे होत्या.
अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांनी चंद्रपूर जिल्ह्यात अवैध मार्गाने दारू पुरवठा होऊ नये, याकरीता महिलांनी, युवकांनी सज्ज असावे, असे आवाहन केले. दारू दुकानदार न्यायालयात जातील. परंतु, महिलांच्या बाजुनेच निर्णय येणार असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी उपस्थित महिलांनी हात पुढे करून दारूमुक्तीचा निर्धार करत नाचत आंनद साजरा केला.
माजी न्यायमुर्ती मीरा खडतकर, चित्रा तूर, मंदाताई देसाई, प्रा. विमल गाडेकर, कल्याणी बुटी, हिराताई बावनकर, सरपंच अतुल लेनगुरे, विजय सिध्दावार, ए.आर. दुधे, प्रभाकर गाडेवार, शोभा वाढई, नामपल्लीवार या मान्यवरांनी यावेळी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक विजय कोरेवार यांनी केले. संचालन किरण शेंडे यांनी तर आभार अनिल मडावी यानी मानले. यावेळी गावातील नागरिकही उपस्थित होते. २२(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Women made the determination of emancipation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.