शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

चंद्रपूर : 'त्या' प्राध्यापकाकडून विदर्भातील चार जिल्ह्यातील महिलांची फसवणूक

By परिमल डोहणे | Updated: September 6, 2022 20:50 IST

स्थानिक गुन्हे शाखेने भंडारा येथून केली अटक

चंद्रपूर : फेसबुक व मॅट्रोमनीवर बनावट आयडी तयार करुन महिलांची फसवणूक करुन त्यांच्याकडून पैसे लाटणे तसेच संधी साधून चोरी करणाऱ्या प्राध्यापकाला स्थानिक गुन्हे शाखेने भंडारा येथून केली अटक केली आहे. त्याच्याकडून २९० ग्रॅम सोने, मोबाईल असा एकूण १२ लाख तीन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सोहम वासनिक रा. भागडी ता. लाखांदूर जि. भंडारा असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. त्याने चंद्रपूर जिल्ह्यातील कोठारीसह, भंडारा, यवतमाळ, नागपूर येथील महिलांची फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे.

सोहम वासनिक हा एका महाविद्यालयात प्राध्यापक आहे. त्याने सोशल मीडियावर सुमित बोरकर या नावाने बनावट आयडी बनवली. यातून तो महिलांशी मैत्री करुन त्यांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांची फसवणूक करायचा. काही दिवसांपूर्वी त्याने चंद्रपूर जिल्ह्यातील कोठारी येथील एका ६७ वर्षीय विधवा महिलेशी सोशल मीडियावर मैत्री केली. तिचा विश्वास संपादन केला. दरम्यान, काही दिवसांपूर्वी तिच्या घरी मुक्कामाला आला. सकाळी ती महिला मॉर्निंग वाकला गेली. अशातच त्याने संधी साधून तिच्या घरातून २४ तोळे सोन्याचे दागीने घेऊन पसार झाला.

याबाबत पीडित महिलेने कोठारी पोलीस स्टेशनला तक्रार दिली. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी पोलीस उपनिरीक्षक अतुल कावळे यांचे पथक गठीत केले. तांत्रिक तपासाच्या आधारे पथकाने भंडारा येथून सोहम वासनिक याला ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक अतुल कावळे, नापोशि नितेश महात्मे, जमिर पठाण, अनुप डांगे, नितेश महात्मे, पोशि प्रसाद धुलगंडे, मयूर येरणे, प्रमोद कोटनाके आदींनी केली.

अशी करायचा महिलांची फसवणूकसोहम वासनिक याने फेसबुक, मॅट्रोमणी, जीवनसाथी आदी सोशल मीडियावर सुमित बोरकर या नावाने बनावट आयडी बनवली. याद्वारे तो महिलांशी संपर्क करुन मैत्री करायचा. आपण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला येथे स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. तसेच माझ्या पत्नीचे निधन झाले असून मला एक मुलगी आहे, असे सांगायचा. त्याने बनावट आयडी कार्ड तसेच एक लाख ४४ हजार रुपयांची बनावट वेतनपावती तयार करुन त्यावर दुसऱ्याच व्यक्तीचा फोटा चिकटवून महिलांना पाठवायचा. तसेच मला लग्न करायचे आहे असे सांगून विश्वास संपादन करायचा. त्यानंतर त्या महिलांच्या घरी जाऊन त्यांना काही अडचणी सांगून पैसे व दागिन्यांची मागणी करायची. पैसे न दिल्यास चोरी करायचा. त्याने यापूर्वी भंडारा, यवतमाळ, नागपूर येथील महिलांची फसवणूक केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी