महिला शेतकरी होणार कापूस खरेदीदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 06:00 IST2019-11-29T06:00:00+5:302019-11-29T06:00:40+5:30
दोन वर्षांपासून अंबुजा सिमेंट फाऊंडेशन अंतर्गत तालुक्यात उत्तम कापून उपक्रम सुरू आहे. ८ हजार ७१२ शेतकरी यात सहभागी आहेत उत्पादनात वाढ होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान व जैविक शेती करून आंतपिक म्हणून चवळी, मका, वाल आदी पिके घेणे सुरू झाले. उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिल्या जात आहे.

महिला शेतकरी होणार कापूस खरेदीदार
शंकर चव्हाण।
लोकमत न्यूज नेटवर्क
जिवती : सावकारी कर्जातून होणारी लुट थांबविण्यासाठी महिला बचत गटांना एकत्र आणून शेतकरी महिलांना कापूस खरेदीदार बनावे व बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठी अंबुजा सिमेंट फाउंडेशनने काही जिनिंगसोबत करार केला. त्यामुळे महिलांनाही कापूस खरेदीदार होता येणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास खरेदी विक्रीतून दलाली, हमाली, काटा व इतर भाड्यातून सुटका मिळणार आहे.
दोन वर्षांपासून अंबुजा सिमेंट फाऊंडेशन अंतर्गत तालुक्यात उत्तम कापून उपक्रम सुरू आहे. ८ हजार ७१२ शेतकरी यात सहभागी आहेत उत्पादनात वाढ होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान व जैविक शेती करून आंतपिक म्हणून चवळी, मका, वाल आदी पिके घेणे सुरू झाले. उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिल्या जात आहे. अंबुजा सिमेंटच्या माध्यमातून शेतकºयांना योग्य मार्गदर्शन मिळत असल्याने शेतकरी आशावादी झाला. परंतु वर्षेभर शेतात मेहनत करायचे व कापूस विक्रीसाठी दलाली, हमाली, काटा व इतर भाडे शेतकºयांनी भरून द्यायचे,असा प्रकार सुरू होता. ही बाब फाऊंडेशनच्या लक्षात आल्याने महिला बचतगटांना एकत्र करून योग्य मार्गदर्शन केले. या मोहिमेमुळे कापूस उत्पादक शेतकºयांना मोठा आधार मिळाला आहे.
कापूस खरेदी ते विक्रीचे तज्ज्ञांकडून प्रशिक्षण
जिवती तालुक्यातील पहाडावरील महिला बचत गटांना अंबुजा सिमेंट फाऊंडेशनच्या वतीने एकत्र करून कापूस उत्पादन ते विक्री आदी विषयांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कापूस खरेदी व विक्रीसाठी सक्षम करून जवळ असलेले बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आले. त्यामध्ये इंदिरा, एक्सिम सोनुर्ली, वैभव वाईट गोल्ड, पांढरपौणी, गणेश काटन खामोना, एफाज कॉटन, श्री गुरूदेव धोपटाळा, साई जिनींग वेढली, सातासर जिनींग, कापनगाव, पारस अॅग्रो-वारोरा, प्रकाश वाईट गोल्ड समुद्रपूर आदी जिनिंगसोबत प्रकल्पाचा करार झाला आहे. पहाडावरील महिला शेतकºयांना याबाबत माहिती करून देण्यासाठी इंदिरा एक्जिम सोनुर्ली येथे अभ्यासदौरा काढण्यात आला. यातून महिला शेतकºयांना विविध प्रकारची माहिती मिळाली. या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन स्वत: कापूस खरेदी ते विक्री या क्षेत्रात पुढाकार घेऊ शकतात. तालुक्यात कापूस उत्पादकांची संख्या अधिक असल्याने अशा मोहिमेची गरज होती.