बचतगटांच्या महिला झाल्या व्यावसायिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:24 IST2021-02-20T05:24:15+5:302021-02-20T05:24:15+5:30

चंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यातील देलनवाडी येथे प्रथमच महिलांच्या पुढाकाराने आठवडे बाजार सुरू झाला आणि पहिल्याच दिवशी सुमारे १७ हजारांची ...

Women became self-help groups | बचतगटांच्या महिला झाल्या व्यावसायिक

बचतगटांच्या महिला झाल्या व्यावसायिक

चंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यातील देलनवाडी येथे प्रथमच महिलांच्या पुढाकाराने आठवडे बाजार सुरू झाला आणि पहिल्याच दिवशी सुमारे १७ हजारांची विक्री झाली. सेंद्रिय पद्धतीने उत्पादित भाजीपाला, स्टेशनरीसह मत्स्यविक्री असे एकूण २५ स्टॉल यात सहभागी झाले होते. यामुळे स्थानिक उत्पादक तसेच स्थानिक खरेदीदार यांची सोय झाली आहे.

उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, पंचायत समिती सिंदेवाही यांच्या अंतर्गत कार्यरत स्वयंसहाय्यता समूहांच्या महिलांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी महिलांनी पुढाकार घेतला. माउली महिला ग्रामसंघ यांनी ग्रामपंचायतकडून बाजारपेठ सुरू करण्याची परवानगी मिळवली. १६ फेब्रुवारी रोजी या बाजारपेठेचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन जि. प. समाजकल्याण सभापती नागराज गेडाम, अध्यक्षस्थानी पं. स. सभापती मंदा बाळबुद्धे, विशेष अतिथी म्हणून गटविकास अधिकारी कुणाल उंदिरवाडे, सरपंच डोंगरावर, पं. स. सदस्य रितेश अलमस्त, उपसरपंच अर्जुनकर, ग्रामसेवक बोरकर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक तालुका अभियान व्यवस्थापक विवेक नागरे यांनी केले. यशस्वीतेकरिता तालुका व्यवस्थापक उद्धव मडावी, प्रभाग समन्वयक ज्ञानेश्वर मलेवार, सविता उईके, ग्रामसंघ अध्यक्ष लीना आनंदे, सुनीता आनंदे, सुलभा गरमडे, विशाखा रामटेके, अस्मिता लेंझे, मयूर खोब्रागडे, सचिन लोधे आदींनी सहकार्य केले.

Web Title: Women became self-help groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.