‘एटीएम अपडेट’च्या नावाखाली महिलेला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2017 00:38 IST2017-02-27T00:38:31+5:302017-02-27T00:38:31+5:30

एटीएम कॉर्ड अपडेट करण्यासाठी खात्यासंबंधी वैयक्तिक माहिती विचारून महिलेच्या खात्यामधून ४० हजार रुपये लंपास केल्याची घटना सावली येथे नुकतीच उघडकीस आली आहे.

The woman was named in the name of 'ATM Update' | ‘एटीएम अपडेट’च्या नावाखाली महिलेला फटका

‘एटीएम अपडेट’च्या नावाखाली महिलेला फटका

सावली येथील घटना : बनावट फोनकॉलद्वारे ४० हजारांनी फसवणूक
चंद्रपूर : एटीएम कॉर्ड अपडेट करण्यासाठी खात्यासंबंधी वैयक्तिक माहिती विचारून महिलेच्या खात्यामधून ४० हजार रुपये लंपास केल्याची घटना सावली येथे नुकतीच उघडकीस आली आहे. वैशाली उमेश अलचावार असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे.
सावली येथील रहिवासी उमेश अलचावार यांचा पानठेल्याचा व्यवसाय आहे. ते भविष्यासाठी व्यवसायातून नियमित बचत करतात. ती रक्कम पत्नी वैशाली अलचावर यांच्या आयडीबीआय बॅकेच्या खात्यावर जमा करीत होते. मात्र अलचावार यांना २१ जानेवारीला ९७०९३८५३९१ या क्रमांकावरुन फोन आला. आपण आयडीबीआय बॅक मुंबईचे मुख्य अधिकारी शर्मा बोलत असल्याची माहिती दिली. तुमचा एटीएम लॉक झालेला आहे. त्यामुळे तो तुम्हाला अपडेट करावा लागेल, असे सांगून त्यांचा खाता क्रमांक विचारला. वैशालीचे पती उमेश यांंनी आम्ही बॅकेत संर्पक करुन आमचे एटीएम सुरु करु, असे त्याला सांगितले. मात्र त्या भामट्या अधिकाऱ्याने तीन ते चार वेळा फोन करुन आजच बॅकेचे काम करणे गरजेचे असल्यामुळे खाते क्रमांक विचारला. वैशालीच्या पतीने बँक खाते क्रमांक दिल्यावर एक मॅसेज पाठवून त्या मॅसेजमधील ओटीपी क्रमांक विचारला. अलचावार यांनी तो क्रमांक त्याला सांगितला.
त्यानंतर १८ फेब्रवारीला ते बॅकेत पैसे काढण्यासाठी गेले असता त्यांच्या खात्यात पैसे नसल्याची माहिती बॅक अधिकाऱ्यांनी अलचावार यांना दिली. त्यामुळे अलचावरला धक्काच बसला. अलचावारने आपल्या खात्यात ४० हजार रुपये असल्याचे सावली येथील बॅक अधिकाऱ्याला सांगीतले. मात्र बॅक अधिकाऱ्यांनी त्यांना स्टेटमेंट दाखवत २१ जानेवारीला १० हजार, २२ जानेवारीला १० हजार, २३ जानेवारीला १० हजार, २४ जानेवारीला पाच हजार, २५ जानेवारीला पाच हजार याप्रमाणे पैसे काढल्याची माहिती दिली. मात्र अलचावार यांनी अधिकाऱ्यांना आपण हे पैसे काढले नसल्याचे सांगितले.
या संदर्भात मुंबई आयडीबीआय बॅकेतून आपल्याला फोन आला होता. त्यामुळे आपण खाते क्रमांक व त्यानंतर पाठवलेल्या मॅसेजमधील ओटीपी क्रमांक त्यांना सांगितली, अशी अलचावार यांनी माहिती दिली. तेव्हा त्या अधिकाऱ्याने फसवणूक करुन पैसे काढल्याची माहिती दिली. बँक अधिकाऱ्याने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्याचा सल्ला दिला. अलचावार यांनी आपल्या पत्नीला घेऊन सावली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. या सर्व घडामोडीत अलचावार यांनी भविष्यासाठी बचत करुन ठेवलेली रक्कम अचानक लंपास झाल्यामुळे आर्थिक चणचण भासत आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: The woman was named in the name of 'ATM Update'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.