रेडलाईट एरियात सापडली तेलंगणातील युवती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2016 01:09 IST2016-07-02T01:09:39+5:302016-07-02T01:09:39+5:30

मागील आठवडाभरापासून तेलंगणातून बेपत्ता असलेली एक युवती चंद्रपुरातील रेडलाईट नावाने ओळखल्या जाणाऱ्या वस्तीत आढळली. यामुळे खळबळ उडाली आहे.

The woman in Telangana found in the RadLeat area | रेडलाईट एरियात सापडली तेलंगणातील युवती

रेडलाईट एरियात सापडली तेलंगणातील युवती

आठवडाभरापासून होती बेपत्ता : पोलिसांना सांगितली आपबिती
चंद्रपूर : मागील आठवडाभरापासून तेलंगणातून बेपत्ता असलेली एक युवती चंद्रपुरातील रेडलाईट नावाने ओळखल्या जाणाऱ्या वस्तीत आढळली. यामुळे खळबळ उडाली आहे.
तेलंगना राज्यातील शिरपूर कागजनगर येथील एक युवती २३ जूनपासून बेपत्ता होती. पालकांच्या तक्रारीवरून तेलंगना पोलीस तिचा शोध घेत होते. दरम्यान, सदर युवती येथील गौतमनगर परिसरात आढळून आली. तिला व मनोज सिंह ठाकूर याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
सदर युवतीचा शोध घेत असताना पोलिसांना ती चंद्रपुरातील गौतम नगर परिसरात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. शिरपूर कागजनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बी. प्रभाकर रेड्डी, सहायक पोलीस निरीक्षक एस. राजेश्वर यांनी चंद्रपुरात येऊन शहर ठाण्याशी संपर्क साधला.
शहर पोलिसांच्या मदतीने गौतमनगर परिसरात जाऊन चौकशी केली असता सदर युवती तिथे आढळून आली. हा परिसर रेड लाईट एरिया म्हणून प्रसिध्द आहे, हे विशेष.
ही युवती चंद्रपुरात पोहचली कशी हे कोडेच आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तेलंगणातून तिचे अपहरण करून चंद्रपुरात आणण्यात आले होते, अशी माहिती आहे. या संदर्भात सदर तरूणीने शहर पोलीस ठाण्यात पोहचून आपबिती सांगितली. मात्र अधिक तपशिल कळू शकला नाही. (शहर प्रतिनिधी)

Web Title: The woman in Telangana found in the RadLeat area