फवणुकीच्या प्रकरणातील महिलेला दोन दिवस पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:27 IST2021-04-13T04:27:11+5:302021-04-13T04:27:11+5:30
सुजाता बाकडे या महिला आरोपीवर हिंगणघाट पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. या महिलेने दुर्गापूर परिसरातील गोरगरीब महिलांना हेरून ...

फवणुकीच्या प्रकरणातील महिलेला दोन दिवस पोलीस कोठडी
सुजाता बाकडे या महिला आरोपीवर हिंगणघाट पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.
या महिलेने दुर्गापूर परिसरातील गोरगरीब महिलांना हेरून त्यांच्याकडून ६३ लाख रुपये गंडविले. या तपासाकरिता पोलिसांना तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती. या दिवसात महिलेने पोलिसांना केवळ गुंगारा देत वेळ मारून नेली. पोलीस कोठडी संपल्याने परत सोमवारी पोलिसांनी तिला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर प्रकरणाच्या चौकशीकरिता चंद्रपूरचे पोलीस उपविभागीय अधिकारी शीलवंत नांदेडकर दुर्गापूर ठाण्यात आले होते. दोन दिवसांत तिची कसून चौकशी करून ६३ लाख रुपये कुठे ठेवले याबाबत पोलीस तपास करीत आहे.