अज्ञात वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू, तिघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:39 IST2021-02-05T07:39:56+5:302021-02-05T07:39:56+5:30
मृत महिलेचे नाव दीपाली विनोद जालरवार (वय ३४, रा. चंदनखेडा) असे आहे. विनोद वासुदेव जालरवार (४२), वेदांत विनोद जालरवार ...

अज्ञात वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू, तिघे जखमी
मृत महिलेचे नाव दीपाली विनोद जालरवार (वय ३४, रा. चंदनखेडा) असे आहे. विनोद वासुदेव जालरवार (४२), वेदांत विनोद जालरवार (११), निदांत विनोद जालरवार (५ ) या जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
चंदनखेडा येथील विनोद वासुदेव जालरवार हे एमएच ३४ बीई ०८९८ क्रमांकाच्या दुचाकीने पत्नी दीपाली व
दोन मुलांसह चंद्रपूर येथे साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपून चंदनखेडाकडे परत येताना मानोरा फाट्याजवळ दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात दीपाली जालरवार गंभीर जखमी झाल्या. त्यांना लगेच जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. भद्रावती पोलिसांनी पंचनामा करून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे