वाघाच्या हल्ल्यात चंद्रपुरात वृद्धा ठार

By Admin | Updated: January 9, 2017 04:16 IST2017-01-09T04:16:41+5:302017-01-09T04:16:41+5:30

जिल्ह्यात सिंदेवाही तालुक्यातील चकबामणी येथे रविवारी शेतात काम करणाऱ्या एका वृद्धेवर वाघाने हल्ला चढविला. त्यात ती जागीच ठार झाली.

Woman killed in Chandrapur killed in Togo | वाघाच्या हल्ल्यात चंद्रपुरात वृद्धा ठार

वाघाच्या हल्ल्यात चंद्रपुरात वृद्धा ठार

मोहाडी-नलेश्वर (चंद्रपूर) : जिल्ह्यात सिंदेवाही तालुक्यातील चकबामणी येथे रविवारी शेतात काम करणाऱ्या एका वृद्धेवर वाघाने हल्ला चढविला. त्यात ती जागीच ठार झाली. मीराबाई नारायण चौधरी (६०) असे तिचे नाव आहे.
शिवनी वन परिक्षेत्रात चकबामनी येथील मीराबाई अन्य महिलांसमवेत शेतात तुरीच्या शेंगा तोडण्याकरिता गेली होती. अन्य महिलांनी आवाज देऊनही प्रतिसाद
न मिळाल्याने त्यांनी तुरीच्या झाडांमध्ये जाऊन पाहिले असता वाघाच्या हल्ल्यात त्या ठार झाल्याचे आढळून आले.
हा परिसर व्याघ्र प्रकल्पाला लागून असल्याने तेथे वाघाचा नेहमी वावर असतो.
बिबट्या मृतावस्थेत आढळला
चंद्रपूर महाऔष्णिक केंद्राच्या कोयना गेटपासून काही अंतरावर सुरक्षा भिंतीतील सांडपाण्याच्या खिडकीमध्ये एक बिबट्या वीज केंद्र कर्मचाऱ्यांना रविवारी सकाळी फासात अडकून मृत झालेला आढळला. हा बिबट्या अडीच ते
तीन वर्षांचा मादी जातीचा आहे. याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली. (प्रतिनिधी)

Web Title: Woman killed in Chandrapur killed in Togo